India vs Australia 2nd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टेस्ट अॅडलेडमध्ये सुरु झाली आहे. पाच टेस्टच्या सीरिजमधील पहिली टेस्ट टीम इंडियानं जिंकलीय. दुसऱ्या टेस्टमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या भारतीय टीमला पहिल्या इनिंगमध्ये मोठी धावसंख्या करता आली नाही. भारतीय टीम 180 रनवरच ऑल आऊट झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं चांगली सुरुवात करत खेळ संपेपर्यंत 1 आऊट 86 रन केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिराज संतापला
ऑस्ट्रेलियन इनिंगमधील 25 व्या ओव्हरमध्ये मैदानात वातावरण चांगलंच तापलं होतं. ऑस्ट्रेलियन बॅटर मार्नस लाबुशेनच्या कृतीनं भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज चांगलाच संतापला होता. सिराजच्या त्या ओव्हरमध्ये लबुशेन बॅटिंग कर
( नक्की वाचा : मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल )
लबुशेनच्या समोर साइट स्क्रिवर एक माणूस पाईप घेऊन जात होता. त्यामुळे लबुशेननं बॉल न खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या कृतीमुळे सिराज संतापला. त्यानं रागानं बॉल लबुशेनच्या दिशेनं फेकला. अर्थाह तो बॉल कुणाला लागला नाही. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
• Man runs behind the sight screen with a beer snake
— 7Cricket (@7Cricket) December 6, 2024
• Marnus pulls away while Siraj is running in
• Siraj is not happy
All happening at Adelaide Oval 🫣 #AUSvIND pic.twitter.com/gRburjYhHg
पहिल्या टेस्टमध्ये झाला होता वाद
मोहम्मद सिराज आणि मार्नस लबुशेन यांच्यामध्ये खडाजंगी होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी पहिल्या टेस्टमध्येही हे दोघं एकमेकांच्या समोर आले होते. त्या टेस्टमधील ऑस्ट्रेलियन इनिंगमधील 13 व्या ओव्हरमध्ये सिराजनं शॉर्ट बॉल टाकला. तो लबुशेननं बचावात्मक पद्धतीनं खेळून काढला. त्यावेळी सिराज तो बॉल घेण्यासाठी गेला होता, तेव्हा लबुशेननं बॅटनं बॉल दूर ढकलला. त्यानंतर सिराज आणि लबुशेन आमने-सामने आले होते. त्यावेळी विराट कोहलीनं सिराजची बाजू घेत नाराजी व्यक्त केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world