'माझी गरज नसेल तर...' आर. अश्विनचं निवृत्तीपूर्वी रोहितशी झालेलं संभाषण उघड

R. Ashwin Retirement : अश्विनच्या निवृत्तीनंतर काय बोलावं हे सूचत नसल्याचं रोहितनं मान्य केलं. अश्विन हा टीम इंडियाचा दिग्गज मॅच विनर खेळाडू होता, अशी प्रशंसा रोहितनं केली. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

R. Ashwin Retirement : महान क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा ऑल राऊंडर आर. अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टनंतर अश्विननं हा निर्णय जाहीर केला. अश्विननं मॅच संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कॅप्टन रोहित शर्मासोबत उपस्थित होता. अश्विननं निवृत्तीच्या घोषणेनंतर अन्य प्रश्नांना उत्तर दिलं नाही. पण, अश्विनच्या निवृत्तीनंतर काय बोलावं हे सूचत नसल्याचं रोहितनं मान्य केलं. अश्विन हा टीम इंडियाचा दिग्गज मॅच विनर खेळाडू होता, अशी प्रशंसा रोहितनं केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाला रोहित?

अश्विनबद्दल बोलताना रोहित म्हणालाकी, 'तो (अश्विन) त्याच्या निर्णयावर ठाम होता. मी पर्थमध्ये आल्यानंतर मला त्याबद्दल समजलं. मी सुरुवातीचे तीन-चार दिवस तिथं नव्हतो. पण हा निर्णय तेव्हापासूनच त्याच्या डोक्यात होता. त्यावेळी अर्थातच बऱ्याच गोष्टी घडत होत्या. मला खात्री आहे की अश्विन योग्यवेळी त्यावर उत्तर देईल.'

रोहित अश्विनच्या निवृत्तीबाबत बोलताना पुढे म्हणाला की, 'टीमचा काय विचार सुरु आहे, त्याला त्याची जाणीव आहे. आम्ही कोणतं कॉम्बिनेशनचा विचार करतोय हे त्याला माहिती आहे आहे. आम्ही इथं आलो त्यावेळी स्पिनर खेळणार की नाही याबाबत खात्री नव्हती. आम्हाला पहिल्यांदा आमच्यासमोरील परिस्थितीचं आकलन करायचं होतं. मी पर्थमध्ये आलो त्यावेळी आमच्यामध्ये हे बोलणं झालं होतं. मी त्याला कसंतरी पिंक बॉल टेस्ट खेळण्यासाठी तयार केलं.' पर्थमध्ये टीम इंडियानं वॉशिंग्टन सुंदरला खेळवलं होतं. त्यानंतर अ‍ॅडलेडमध्ये पिंक बॉल टेस्टमध्ये अश्विनला खेळवण्यात आलं. 

Advertisement

( नक्की वाचा : 'तू मला सांगितलंस तेव्हा...' अश्विनचा निर्णय समजताच हळवा झाला विराट, मित्राला दिल्या भावुक शुभेच्छा )

रोहित पुढं म्हणाला की, 'काही निर्णय खासगी असतात. आपण त्यावर प्रश्न विचारु शकत नाही. एका खेळाडूनं काही ठरवलं असेल तर आपण त्याला त्याचा हक्क दिला पाहिजे. अश्विनसारखा खेळाडू जो नेहमी आमच्यासोबत उभा होता, त्याला हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. एक टीम म्हणून आम्हाला आमच्या सहकाऱ्यानं घेतलेल्या निर्णयाचा आदर करावा लागेल. त्याला काय हवंय हे त्याच्या डोक्यात नक्की होतं. टीमनं त्याला पूर्ण साथ दिली,' असं रोहितनं सांगितलं.

Topics mentioned in this article