Virat Kohli Pens Heartfelt Message On Ashwin's Retirement: महान क्रिकेटपटू आर. अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अश्विनचा सहकारी, माजी कॅप्टन विराट कोहलीनं त्याच्या प्रिय मित्राला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर विराटनं प्रिय मित्रासाठी एक भावुक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केलीय. अश्विनच्या रिटायरमेंटबाबत जेव्हा विराटला समजलं तेव्हा तो चांगलाच हळवा झाला होता. विराटच्या मनातील अश्विनबद्दलचा आदर त्याच्या पोस्टमधून व्यक्त झालाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला विराट?
विराट कोहलीनं सोशल मीडिया नेटवर्क एक्सवर पोस्ट शेअर केलीय. त्यामध्ये त्यानं लिहिलंय, 'मी तुझ्याबरोबर 14 वर्ष खेळलो आहे. तू आज मला रिटायर होत असल्याचं सांगितलंस तेव्हा मी थोडा भावुक झालो. तुझ्याबरोबर खेळतानाच्या सर्व आठवणी माझ्या मनात दाटून आल्या.
मी तुझ्या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. तुझं कौशल्य आणि भारतीय क्रिकेट मॅचमधील विजयातील योगदान हे अभूतपूर्व आहे. तू नेहमीच एक महान खेळाडू म्हणून ओळखला जाशील.
I've played with you for 14 years and when you told me today you're retiring, it made me a bit emotional and the flashbacks of all those years playing together came to me. I've enjoyed every bit of the journey with you ash, your skill and match winning contributions to Indian… pic.twitter.com/QGQ2Z7pAgc
— Virat Kohli (@imVkohli) December 18, 2024
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट सीरिज सध्या सुरु आहे. दोन्ही टीममधील ब्रिस्बेनमध्ये झालेली तिसरीा टेस्ट बुधवारी ड्रॉ झाली. ही टेस्ट संपल्यानंतर आर. अश्विननं अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
( नक्की वाचा : आर. अश्विनचा क्रिकेटला अलविदा; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा )
38 वर्षांचा अश्विननं भारताकडून अनिल कुंबळे (619 विकेट) नंतर 106 मॅचमध्ये सर्वाधिक 537 टेस्ट विकेट्स घेतल्या आहेत. तो 2011 मधील वन-डे वर्ल्ड कप आणि 2013 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय टीमचा सदस्य होता. अश्विनला आगामी आयपीएल सिझनसाठी चेन्नई सुपर किंग्सनं खरेदी केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world