India vs England 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट सध्या लीड्समध्ये सुरु आहे.या टेस्टमध्ये टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जैस्वालनं (Yashasvi Jaiswal) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यशस्वीनं लीड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली.
यशस्वीनं 144 बॉल्समध्ये 16 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं त्याची सेंच्युरी पूर्ण केली. विशेष म्हणजे यशस्वीची इंग्लंडमधील ही पहिलीच टेस्ट इनिंग आहे. या इनिंगमध्ये त्यानं सेंच्युरी झळकावत मोठा विक्रम केला आहे. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली या सारख्या भारताच्या दिग्गजांनाही इंग्लंडमध्ये पहिल्या टेस्ट इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावण्यात अपयश आले होते. या दिग्गजांना जे जमलं नाही, ते यशस्वीनं केलं.
हेडिंग्ले टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सनं टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला होता. सकाळच्या सत्राचा फायदा घेण्याची यजमान टीमची योजना यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी यशस्वी होऊ दिली नाही. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 91 रन्सची पार्टनरशिप केली.
राहुल 42 रन्स काढून आऊट झाला. आयपीएल 2025 गाजवणाऱ्या साई सुदर्शननं या टेस्टमध्ये पदार्पण केलं. पण, तो पदार्पणातील इनिंगमध्ये साफ अपयशी ठरला. त्याला बेन स्टोक्सनं शून्यावरच आऊट केलं.