
India vs England 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टला शुक्रवारी (20 जून) हेडिंग्लेमध्ये सुरुवात झाली आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाकडून साई सुदर्शननं पदार्पण केलं. 23 वर्षांच्या अनुभवी बॅटर चेतेश्वर पुजाराने टेस्ट कॅप दिली. या टेस्टमध्ये इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेडिंग्ले टेस्टमधील टीम इंडियामध्ये शार्दूल ठाकूर आणि करुण नायर या दोन अनुभवी खेळाडूंनी पुनरागमन केलं आहे. तर 306 आंतरराष्ट्रीय विकेट्स (टेस्ट - 56, वन-डे - 181, T20 - 69) घेणार्या कुलदीप यादवला अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सनं टॉस जिंकल्यानंतर सांगितलं की, 'आम्ही प्रथम बॉलिंग करणार आहोत. 'हेडिंग्लेची खेळपट्टी क्रिकेटसाठी खूप चांगली आहे, येथे आमचे काही खूप चांगले सामने झाले आहेत. सुरुवातीच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू. खूप दिवसांपासून वाट पाहत होतो, ही फक्त दुसरी सीरिज आहे हे थोडे विचित्र वाटते पण आम्ही तयार आहोत. तयारी संमिश्र होती.
काही खेळाडूंनी काउंटी क्रिकेट खेळले आहे. आम्ही तीन दिवस खूप चांगले क्रिकेट खेळलो. आघाडीच्या सात बॅटरमध्ये नेहमीचेच खेळाडू आहेत, तर वोक्स, ब्रायडन, बशीर, टंग आणि मी स्वतः बॉलिंग डिपार्टमेंट सांभाळणार आहोत.
( नक्की वाचा : IND vs ENG : 'कर्म कधीच माफ करत नाही' टीम इंडियातून वगळलेल्या खेळाडूचा हेड कोच गंभीरवर निशाणा? )
कॅप्टन गिलची पसंती काय होती?
टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलनं देखील पहिल्यांदा बॉलिंग करणे आवडले असते, अशी कबुली दिली आहे. गिल म्हणाला, 'मी पण पहिल्यांदा बॉलिंगच केली असती, पहिल्या सत्रात थोडी कठीण परिस्थिती असू शकते पण नंतर बॅटिंगसाठी चांगली परिस्थिती होईल. सूर्यप्रकाश आहे, त्यामुळे ही आमच्यासाठी चांगली फलंदाजीची खेळपट्टी असावी.
आमची तयारी उत्कृष्ट झाली आहे, आम्ही बेकनहॅममध्ये सराव सामना खेळलो, खेळाडूंना खूप चांगले वाटत आहे. साई पदार्पण करत आहे, करुण टीममध्ये परतला आहे. साई तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करेल.'
इंग्लंड Playing XI : बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कॅप्टन), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर.
टीम इंडिया Playing XI : केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world