India vs England 3rd ODI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला तिसरा आणि शेवटचा वन-डे सामना टीम इंडियानं 142 रन्सनी जिंकला. या विजयासह भारतानं ही सीरिज 3-0 अशा फरकानं जिंकली आहे. रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या भारतीय टीमनं वन-डे सीरिजमधील सर्व सामने जिंकत इंग्लंडचा सूपडा साफ केला. त्याचबरोबर आगामी चॅम्पिन्स ट्रॉफीसाठी सज्ज असल्याचा इशाराही इतर टीम्सना दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय टीमनं पहिल्यांदा बॅटिंग करत इंग्लंडला विजयाचं 357 रन्सचं विशाल लक्ष्य दिलं होतं. पाहुण्या टीमला हे आव्हान पेलवलं नाही. इंग्लंडच्या टॉप पाच बॅटर्सपैकी एकाला पन्नासचा टप्पा ओलांडता आला नाही. टॉम बँटन (38) आणि गस एटिंकसन (38) यांनी इंग्लंडकडून सर्वाधिक रन काढले.
इंग्लंडला 357 रन्सचा पाठलाग करताना अपेक्षित रनरेट कधीच गाठता आला नाही. त्याचा दबाव इंग्लंडवर वाढत गेल्या. त्यांनी ठराविक अंतरानं विकेट्स गमावल्या. अखेर इंग्लंडची संपूर्ण टीम 34.2 ओव्हर्समध्ये 214 रन्स काढून ऑल आऊट झाली. भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्यानं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
गिलची दमदार सेंच्युरी
त्यापूर्वी भारताकडून शुबमन गिलनं दमदार सेंच्युरी केली. गिलनं 102 बॉलमध्ये 112 रन केले. विराट कोहलीनं 52 तर श्रेयस अय्यरनं 78 रनची खेळी केली. तर केएल राहुल 40 रन काढून आऊट झाला.
( नक्की वाचा : मेडिकल रिपोर्ट OK तरीही बुमराहाला का वगळण्यात आलं? निवड समितीच्या बैठकीची Inside Story )
या दमदार विजयानंतर टीम इंडियाचं पुढील लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेत भारताची पहिली लढत 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आहे. भारताच्या गटात बांगलादेशसह पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा समावेश आहे.