IND vs ENG : टीम इंडियाला धोका! राहुलला आऊट करणाऱ्या 6 फुट 4 इंच बॉलरचा इंग्लंडनं केला समावेश

IND vs ENG, 1st Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट 20 जूनपासून हेडिंग्लेमध्ये सुरु होत आहे. या टेस्टसाठी दोन्ही टीमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
IND vs ENG : इंग्लंडच्या टीममध्ये 6 फूट 4 इंच फास्ट बॉलरचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई:

IND vs ENG, 1st Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट 20 जूनपासून हेडिंग्लेमध्ये सुरु होत आहे. या टेस्टसाठी दोन्ही टीमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. टीम इंडियानं शेवटच्या क्षणी कव्हर म्हणून हर्षित राणाचा समावेश केल्याचं वृत्त आहे. तर दुसरिकडं इंग्लंडनंही त्यांच्या टीममध्ये 6 फूट 4 इंच फास्ट बॉलरचा समावेश केला आहे. 

इंग्लंडनं त्यांच्या टीममध्ये हॅम्पशायरचा फास्ट बॉलर एडी जॅकला (Eddie Jack) घेतलं आहे. त्यानं भारत 'अ' विरुद्ध इंग्लंड लॉयन्सकडून प्रभावी कामगिरी केली होती. जोश टंग दुखापतीमुळे बाहेर गेल्यानं त्याच्या जागी बॅकअप म्हणून संधी मिळाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

19 वर्षीय जॅकने नॉर्थम्प्टनमधील दुसऱ्या अनधिकृत टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये केएल राहुलला आऊट करुन सर्वांचं लक्ष वेधलं. राहुलनं त्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली होती. तो सामना ड्रॉ झाला. पण जॅकनं त्याच्या फास्ट बॉलिंगनं टीम इंडियाच्या प्रमुख बॅटर्सना चांगलंच सतावलं होतं. 

जॅकने अजूनपर्यंत हॅम्पशायरसाठी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले नाही. त्याने आतापर्यंत दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि ते दोन्ही भारत 'अ' विरुद्धच आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला तो दक्षिण आफ्रिकेत इंग्लंडच्या 19 वर्षांखालील  टीमकडून खेळला होता. नॉर्थम्प्टन सामन्यात जॅकने नितीश रेड्डी आणि ध्रुव जुरेलला अडचणीत आणलं होतं. त्याचबरोबर गेल्या महिन्यात त्यानं झिम्बाब्वेविरुद्धच्या सराव सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

Advertisement

 ( नक्की वाचा : Jasprit Bumrah : शुबमन गिल कॅप्टन कसा झाला? जसप्रीत बुमराहनं सांगितली Inside Story )

इंग्लंडला दिलासा

जॅकची बॅकअप म्हणून टीममध्ये एन्ट्री झाल्यानं इंग्लंडच्या फास्ट बॉलर्सना दिलासा मिळालाय. जोफ्रा आर्चर या सीरिजमधील पहिल्या टेस्टमधून बाहेर पडलाय. मार्क वूड संपूर्ण सीरिज उपलब्ध नाही. गस ऍटकिन्सन अजूनही झिम्बाब्वेविरुद्धच्या टेस्टमध्ये झालेल्या दुखापतीमधून बरा झालेला नाही. जॅकला अजून अधिकृतपणे टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. पण, सराव सत्रातील त्याची कामगिरी पाहून त्याचा अंतिम 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.   

पहिल्या टेस्टसाठी इंग्लंडची टीम : शोएब बशीर, जेकेब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कूक, झॅक क्रॉली, बेन डकेत, जेमी ओव्हरटोन, ओली पोप, जो रुट, जेमी स्मिथ (विकेट किपर), बेन स्टोक्स (कॅप्टन), जोश टंग, ख्रिस वोक्स, एडी जॅक (बॅकअप)

Advertisement
Topics mentioned in this article