IND vs ENG 3rd T20 : गंभीरचा चेला पुन्हा इंग्लंडवर भारी! अर्धी टीम केली गारद

IND vs ENG 3rd T20 : भारताचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakravarthy) फिरकीचं उत्तर शोधण्यात इंग्लंडला पुन्हा एकदा अपयश आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

IND vs ENG 3rd T20 : भारताचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakravarthy) फिरकीचं उत्तर शोधण्यात इंग्लंडला पुन्हा एकदा अपयश आलं आहे.  भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील राजकोट T20 मध्ये चक्रवर्तीनं 24 रन्स देत 5 विकेट्स घेतल्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका इनिंगमध्ये 5 विकेट्स घेण्याची कामगिरी वरुणनं दुसऱ्यांदा केली आहे. यापूर्वी त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रमक केला होता. वरुणच्या या स्पेलमुळे इंग्लंडला मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. पाहुण्या टीमनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 171 पर्यंत मजल मारली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वरुणनं लावला ब्रेक

राजकोटमधील लढतीमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. फिल सॉल्ट झटपट आऊट झाला. त्यानंतर बेन डकेत आणि कॅप्टन जोस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 76 रनची पार्टनरशिप केली.

डकेट-बटलर जोडी खेळत असताना इंग्लंड 200 चा टप्पा सहज ओलांडेल असं वाटत होतं. त्यावेळी वरुणनं बटलरला आऊट करत ही जोडी फोडली. त्यानंतर त्यानं ठाराविक अंतरानं विकेट्स घेतल्या. वरुणनं या इनिंगमध्ये बटलरसह जेमी स्मिथ,जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्से आणि जोफ्रा आर्चर यांना आऊट केलं.

कोलकाता नाईट रायडर्सनं गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावलं होतं. केकेआरच्या आयपीएल विजेतेपदामध्ये वरुणचं महत्त्वाचं योगदान होतं. वरुणनं या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या टी20 टीममध्ये पुनरागमन केलं. 

Advertisement

वरुणनं टीम इंडियात पुनरागमन केल्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. सध्या सुरु असलेल्या टी20 सीरिजमधील 3 मॅचमध्ये त्यानं सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या आहेत.

( नक्की वाचा : Jasprit Bumrah बुमराहनं इतिहास घडवला ! ICC चा हा सन्मान मिळवणारा पहिला भारतीय )

शमीचं पुनरागमन

राजकोटमधील टी20 सामन्यात टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीचा अर्शदीप सिंगच्या जागी समावेश केला. तो वन-डे वर्ल्ड कप 2023 नंतर दुखापतीमुळे टीमच्या बाहेर होता. त्यानं 15 महिन्यानं पुनरागमन केलं. शमीनं या मॅचमध्ये 3 ओव्हर्समध्ये 25 रन दिले पण, त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

Advertisement

भारताकडून वरुण चक्रवर्तीनं 5, हार्दिक पांड्यानं 2 तर रवी बिश्नोई आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 1 विकेट घेतली. इंग्लंडकडून बेन डकेतनं सर्वाधिक 51 रन केले. तर लियाम लिव्हिंगस्टोननं 43 रनची खेळी केली. पाच सामन्यांच्या या T20 सीरिजमधील पहिले दोन सामने टीम इंडियानं जिंकले आहेत. 
 

Topics mentioned in this article