IND vs ENG : टीम इंडियात होणार शेवटच्या क्षणी बदल! INDA 'A' चा स्टार इंग्लंडमध्येच थांबणार?

India vs England Test Series : इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियात शेवटच्या क्षणी बदल होऊ शकतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
India vs England Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टला फक्त 4 दिवस शिल्लक आहेत. (फोटो - BCCI)
मुंबई:


India vs England Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्टची सीरिज सुरु व्हायला आता फक्त चार दिवस उरले आहेत. भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश सदस्यांनी तीन सराव सामन्यांनी या स्पर्धेची तयारी केली. यापैकी दोन सामने इंग्लंड लायन्सविरुद्ध होते, तर एक सामना इंट्रा-स्क्वाड (संघांतर्गत) होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारतीय क्रिकेट टीमसोबतच, इंडिया 'अ' टीमचे सदस्य देखील गेल्या दोन आठवड्यांपासून इंग्लंडमध्ये दौऱ्यावर आहेत. सर्फराज खान, ऋतुराज गायकवाड, अंशुल कंबोज, खलील अहमद, हर्षित राणा यांसारखे खेळाडू इंडिया 'अ' टीमचा भाग होते.  Revsportz च्या एका व्हिडिओ रिपोर्टनुसार, राणा (Harshit Rana) ला इंग्लंडमध्येच थांबण्यास सांगितले आहे.

टीममध्ये होणार बदल?

राणाने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या एका सराव मॅचमध्ये खेळून एक विकेट घेतली होती.  हर्षित राणाच्या या समावेशामुळे मुख्य टीममध्ये काही बदल होण्याची शक्यता वाढली आहे. इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग हे फास्ट बॉलर्स आहेत. बुमराह सर्व मॅचसाठी उपलब्ध नसेल, असे आधीच जाहीर करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Mumbai Indians : मुंबई इंडियन्स 'इन अ‍ॅक्शन' पुढील सिझनपूर्वी रोहित शर्मासह 5 जणांची होणार हकालपट्टी? )
 

दरम्यान, टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर मंगळवारी पुन्हा टीममध्ये दाखल होतील. गेल्या आठवड्यात कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे गंभीर तातडीनं मायदेशी परतला होता. गंभीर यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याने आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने तो तातडीने भारतात परतले होता.

Advertisement

'गंभीरच्या आई आता बऱ्या आहेत. गौतम मंगळवारी निघेल आणि त्याच दिवशी टीममध्ये दाखल होईल,' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय टेस्ट टीम 2007 नंतर इंग्लंडमध्ये आपली सीरिज जिंकण्याच्या प्रयत्नात आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुभमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (व्हाईस कॅप्टन/विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.

पहिल्या टेस्टसाठी इंग्लंडची टीम : शोएब बशीर, जेकेब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कूक, झॅक क्रॉली, बेन डकेत, जेमी ओव्हरटोन, ओली पोप, जो रुट, जेमी स्मिथ (विकेट किपर), बेन स्टोक्स (कॅप्टन), जोश टंग आणि ख्रिस वोक्स

Advertisement
Topics mentioned in this article