Mukesh Kumar post on social media viral: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचची सीरिज सुरु होण्यास आता काही तास शिल्लक आहेत. दोन्ही टीममधील पहिली टेस्ट 20 जूनपासून हेडिंग्लेमध्ये सुरु होत आहे. पहिली टेस्ट जिंकून सीरिजमध्ये आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. या टेस्टपूर्वी टीम इंडियात एक बदल झाला आहे. फास्ट बॉलर हर्षित राणाचा (Harshit Rana) टीममध्ये समावेश करण्यात आलाय. हर्षितच्या समावेशाचे पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. टीम इंडियाचा फास्ट बॉलर मुकेश कुमारनं एक पोस्ट लिहून त्याची नाराजी व्यक्त केली आहे, असं मानलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुकेशने केंटरबरी येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध पहिली अनधिकृत टेस्ट मॅच खेळली होती. त्यामध्ये त्यानं तीन विकेट्स घेतल्या. मात्र, नॉर्थम्प्टन येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आले. तसेच, गेल्या आठवड्यात केंटमध्ये झालेल्या इंट्रा-स्क्वाड सराव सामन्यातही त्याला संधी मिळाली नाही.
मुकेशने इंस्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'कर्माची वेळ येतेच... तुम्हाला नेहमी सावध राहावे लागते... कर्म कधीच माफ करत नाही आणि त्याचे फळ नेहमीच मिळते.'
हर्षित राणाच्या निवडीनंतर मुकेशची पोस्ट
मुकेशची ही पोस्ट फास्ट बॉलर हर्षित राणाच्या टीममधील निवडीनंतर एक दिवसांनी आली आहे. विशेष म्हणजे, राणाने लायन्सविरुद्धच्या पहिल्या अनधिकृत टेस्टमध्ये खराब प्रदर्शन केले होते आणि त्याला केवळ एकच विकेट घेता आली होती. असे असूनही, भारत 'अ' संघाचा भाग असलेल्या राणाचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : 'ले ले प्लेट, भाड़ में गया बिरयानी', रवी शास्त्रींनी डिवचताच शमी संतापला! त्यानंतर मैदानात आलं वादळ, Video )
गौतम गंभीर लक्ष्य?
क्रिकेट वर्तुळात सध्या एक चर्चा सुरू आहे की, हर्षित राणा हा गौतम गंभीरच्या मर्जीतील खेळाडू आहे. गंभीरने आयपीएल 2025 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स टीमचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून काम केले होते. हर्षित राणा त्यावेळी त्याच टीमचा सदस्य होता. गंभीरच्या मार्गदर्शनाखालीच हर्षितने त्या आयपीएल सिझनमध्ये दमदार कामगिरी केली होती.
याहून महत्त्वाचे म्हणजे, गंभीर टीम इंडियाचा हेड कोच बनल्यानंतर, हर्षित राणाने भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. इतकंच नाही, तर बीसीसीआयचे काही नियम पूर्ण न करूनही हर्षितला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे, तर अनेक अनुभवी खेळाडूंना अजूनही यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मुकेश कुमारनं या पोस्टमधून हर्षितसह हेड कोच गंभीरलाही लक्ष्य केल्याचं मानलं जात आहे.
हेडिंग्लेतील पिच आणि भारताची कामगिरी
हेडिंग्लेमध्ये भारताने अलिकडच्या काळात जास्त सामने खेळले नाहीत. 2021 मध्ये भारताला येथे एका इनिंगनं पराभवाला सामोरे जावे लागले होते. यापूर्वी, भारताने 2002 मध्ये येथे सामना खेळला होता, त्यावेळी भारताने एका इनिंग आणि 46 रन्सच्या फरकाने विजय मिळवला होता. या वेळी हेडिंग्लेमध्ये सपाट पिच असण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा बॅटर्सना होऊ शकतो.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया : शुभमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (व्हाईस कॅप्टन/विकेटकिपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि हर्षित राणा