IND vs NZ : रोहित आणि विराटनं हे काय केलं ! मुंबई टेस्टमध्येही टीम इंडिया अडचणीत

India vs New Zealand, Mumbai Test : रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोन दिग्गज खेळाडूंचं अपयश टीम इंडियाच्या खराब अवस्थेचं महत्त्वाचं कारण आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

India vs New Zealand, Mumbai Test : टीम इंडियाच्या बॉलर्सनं केलेल्या कामगिरीवर भारतीय बॅटर्सनी पुन्हा एकदा पाणी ओतलं आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरी टेस्ट मुंबईत सुरु झाली. या टेस्टच्या पहिल्या दिवसाच्या अखेरीस न्यूझीलंडच्या सर्वबाद 235 रनचा पाठलाग करताना टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 86 झाली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोन दिग्गज खेळाडूंचं अपयश टीम इंडियाच्या खराब अवस्थेचं महत्त्वाचं कारण आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रोहितचे पहिले पाढे...

आक्रमक सुरुवात केली की आऊट होण्याच्या परंपरेचं रोहित शर्मानं घरच्या मैदानावरही पालन केलं. यशस्वीसह ओपनिंगला आलेल्या रोहितनं 3 फोर लगावत आक्रमक सुरुवात केली होती.  टीम इंडियासाठी रोहितच्या आक्रमक सुरुवातीपेक्षा त्यानं यशस्वी सोबत पहिल्या दिवसाचा उर्वरित खेळ आऊट न होता खेळणं जास्त गरजेचे होते. पण, कॅप्टन रोहित शर्माला ती जबाबदारी पूर्ण करता आली नाही. तो मॅट हेन्रीच्या बॉलवर 18 रन काढून आऊट झाला. त्यानं वन-डे स्टाईलनं बॅटिंग करत 18 बॉलमध्ये 18 रन केले.

रोहित शर्मानं या सीरिजमध्ये आत्तापर्यंत 5 इनिंगमध्ये अवघ्या 16 च्या सरासरीनं 80 रन केले आहेत. त्याला या कालावधीमध्ये फक्त एक हाफ सेंच्युरी झळकावता आली आहे. घरच्या मैदानावर रोहितची मोठी इनिंग पाहण्यासाठी वानखेडेवर आलेल्या मुंबईकरांची त्यानं निराशा केली.

IND vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूनं केली सर्फराजची तक्रार, रोहितला करावी लागली मध्यस्थी! पाहा Video

Advertisement

( नक्की वाचा : IND vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूनं केली सर्फराजची तक्रार, रोहितला करावी लागली मध्यस्थी! पाहा Video )

विराटही अपवाद नाही

टीम इंडियाचा 'ऑल टाईम ग्रेट' क्रिकेटपटू विराट कोहली देखील या सीरिजमध्ये झगडतोय. मुंबई टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये तो झटपट आऊट झाला. विराट मैदानात आला तेव्हा टीम इंडियाची अवस्था 3 आऊट 78 होती. शुबमन गिलसोबत दिवसातील उर्वरित काही ओव्हर्स खेळून काढणं हे विराटपुढील मुख्य काम होतं.

Advertisement

पण, तो फक्त 4 रन काढून धक्कादायक पद्धतीनं रन आऊट झाला. टेस्ट मॅचमध्ये रन आऊट होणं हा अपवादात्मक प्रकार मानला जातो. त्यातच साक्षात विराट कोहली रन आऊट होणं हा भारतीय क्रिकेट टीमच्या फॅन्ससाठी मोठा धक्का आहे. विराट आऊट झाल्यानं पहिल्या दिवशी टीम इंडिया बॅक फुटवर गेली आहे. 

IPL 2025 : KKR मॅनेजमेंटची मोठी चूक, शाहरुख खानला लागला 12 कोटींचा चुना, तुमच्या लक्षात आलं का?

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025 : KKR मॅनेजमेंटची मोठी चूक, शाहरुख खानला लागला 12 कोटींचा चुना, तुमच्या लक्षात आलं का? )

रोहित शर्माप्रमाणेच विराट कोहली देखील या सीरिजमध्ये फॉर्मात नाही. त्यानं आत्तापर्यंत 5 इनिंगमध्ये 18.40 च्या सरासरीनं 92 रन केले आहेत. त्यामध्ये फक्त एकाच हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन बड्या खेळाडूच्या अपयशाचा फटका टीम इंडियाला बसला आहे. टीम इंडियानं तब्बल 12 वर्षांनंतर भारतामध्ये टेस्ट सीरिज गमावली आहे.
 

Topics mentioned in this article