IND vs NZ 1st : अरेरे... ऋषभ पंत ठरला दुर्दैवी, बंगळुरुमध्ये जे घडलं ते वाचून तुम्हालाही वाटेल वाईट

India vs New Zealand 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये टीम इंडियानं दमदार कमबॅक केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
India vs New Zealand 1st Test, Rishabh Pant
मुंबई:

India vs New Zealand 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये टीम इंडियानं दमदार कमबॅक केलं आहे. या टेस्टचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची पहिली इनिंग 46 रनवरच संपुष्टात आली. न्यूझीलंडनं पहिल्या इनिंगममध्ये 402 रन करत 356 रनची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियानं 400 रनचा टप्पा ओलांडत न्यूझीलंडला दमदार उत्तर दिलं आहे. 

तिसऱ्या दिवशी सकाळी सर्फराज खाननं सेंच्युरी झळकवली. सर्फराजनं 110 बॉलमध्ये 13 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं त्याच्या टेस्ट कारकिर्दीमधील पहिली सेंच्युरी पूर्ण केली. सर्फराजला ऋषभ पंतनं भक्कम साथ दिली. ऋषभ पंतनं त्याच्या स्टाईलं बॅटिंग करत न्यूझीलंडच्या बॉलर्सवर वर्चस्व गावजवलं पण, तो अखेर दुर्दैवी ठरला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पंतची टेस्ट कारकिर्दीमधील सातवी सेंच्युरी फक्त 1 रननं हुकली. तो 99 रन काढून आऊट झाला. विल्यम ओ'रुर्केनं त्याला बोल्ड केलं.  ऋषभ पंत जीवघेण्या अपघातामुळे एक वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. बांगलादेश विरुद्ध त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. त्या सीरिजमधील चेन्नई टेस्टमध्येही पंतनं सेंच्युरी झळकावत 109 रनची खेळी केली होती. त्यापाठोपाठ बंगळुरमधील सेंच्युरी करण्याची त्याची संधी फक्त 1 रननं हुकली.

बंगळुरु टेस्टच्या तिसऱ्या दिवशी शेवटच्या बॉलवर विराट कोहली 70 रन काढून आऊट झाला होता. त्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी पंत सर्फराजसोबत बॅटिंगला आला. सकाळच्या सत्रात विकेट न गमावता खेळण्याचं आव्हान टीम इंडियापुढं होतं. सर्फराज आणि पंतनं या सत्रातही सकारात्मक बॅटिंग करत हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केलं. 

( नक्की वाचा : IND vs NZ : बंगळुरुमध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी, टेस्ट क्रिकेटमध्ये 'हा' रेकॉर्ड करणारा चौथा भारतीय )

ऋषभ पंत आणि सर्फराज खाननं चौथ्या विकेटसाठी 177 रनची भागिदारी केली. सर्फराज 150 रनवर आऊट झाला. बंगळुरु टेस्टच्या चौथ्या दिवशी देखील काही काळ पावसाचा व्यत्यय आला. पावसामुळे लंचनंतर तासभर खेळ होऊ शकला नाही. 
 

Topics mentioned in this article