IND vs PAK : पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडियाला शोधावी लागतील 4 प्रश्नांची उत्तरं

India vs Pakistan : टीम इंडियाचं पारडं जड आहे. त्यानंतरही भारतीय टीमसमोर काही महत्त्वाची आव्हानं आहेत. या आव्हानांचा मुकाबला टीम रोहित (Rohit Sharma) कशी करणार यावर मॅचचं भवितव्य अवलंबून असेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

India vs Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025  (Champions Trophy 2025) मधील भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील लढत रविवारी (23 फेब्रुवारी) होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड आहे. त्यानंतरही भारतीय टीमसमोर काही महत्त्वाची आव्हानं आहेत. या आव्हानांचा मुकाबला टीम रोहित (Rohit Sharma) कशी करणार यावर मॅचचं भवितव्य अवलंबून असेल. भारतीय टीमसमोर कोणती 4 महत्त्वाची आव्हानं आहेत पाहूया... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अर्शदीप, कुलदीप की...

टीम इंडियानं बांगलादेशविरुद्धचा सामना 6 विकेट्सनं जिंकला होता. ही गोष्ट भारतीय टीमचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. पण, त्या मॅचमध्ये अनुभवी कुलदीप यादवला 10 ओव्हर्समध्ये 43 रन्स दिल्यानंतरही एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे कुलदीप यादवच्या जागेवर वरुण चक्रवर्तीला संधी द्यायची की अर्शदीपला खेळवायचं हा टीम मॅनेजमेंटसमोर मोठा प्रश्न असेल. त्याचं उत्तर टॉसवेळीच मिळणार आहे. 

रोहितची आक्रमकता ?

दुबईच्या पिचवर पॉवर प्लेमध्ये मुक्तपणे बॅटिंग करता आलेली नाही. रोहितनं बांगलादेशविरुद्ध 36 बॉलमध्ये 44 रन काढले होते. आता पाकिस्तानविरुद्ध विशेषत: शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाहच्या विरुद्ध खेळताना आक्रमकता नाही तर मोठा स्कोअर करणे हे आव्हान असेल. 

( नक्की वाचा : IND vs PAK : टीम इंडियाचे 5 खेळाडू करणार पाकिस्तानचं पॅकअप, विजेतेपदाच्या शर्यतीतून करणार आऊट! )
 

विराट कोहलीसमोर चॅलेंज

दुबईतील पिचवर फ्रंटफूटवर खेळून रन काढणे सोपे नाही हे बांगलादेशविरुद्ध स्पष्ट झालं आहे. पाकिस्तानकडं खुशदिल आणि सलमान आगा हे पार्टटाईम बॉलर आहेत. पण. तरीही रविवारी भारतीय बॅटर्सना त्यांच्या विरुद्ध रन्स काढणे अवघड आहे. विशेषत: विराट कोहलीला स्पिनर्सविरुद्ध खेळण्यासाठी नवी पद्धत शोधावी लागेल. 

Advertisement

स्पिनर्स कशी बॉलिंग करणार?

भारतीय स्पिनर्ससाठीही रविवारचा सामना महत्त्वाचा आहे. त्यांना योग्य प्लॅनसह मॅचमध्ये उतरावं लागेल. त्याचबरोबर त्या योजनेनुसार बॉलिंग करावी लागेल. रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलला मिडल ओव्हर्समध्ये अचूक बॉलिंगसह विकेट्स घेण्याचा आव्हान आहे. त्याचबरोबर कुलदीप यादवला संधी मिळाली तर त्यालाही विशेष खबरदारी घ्यावी लागेल. कारण, मागील मॅचमध्ये त्याला एकही विकेट मिळालेली नाही. 

Topics mentioned in this article