IND VS PAK LIVE: दुबईत टीम इंडियाचा धमाका! पाकिस्तान ऑलआऊट, किती धावांचे लक्ष्य?

India Vs Pakistan Champions Trophy: गोलंदाजांचा धमाका पाहायला मिळाला असून भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची अक्षरश: दाणादाण उडाली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने जबरदस्त पाकिस्तानला 241 धावांवर रोखले.

जाहिरात
Read Time: 2 mins

 India Vs Pakistan Champion's Trophy 2025:  चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला होत आहे. या हायहोल्टेज लढतीत भारतीय गोलंदाजांचा धमाका पाहायला मिळाला असून भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची अक्षरश: दाणादाण उडाली. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने जबरदस्त पाकिस्तानला 241 धावांवर रोखले. यासोबतच टीम इंडियाला विजयासाठी 50 षटकांमध्ये 242 धावांची गरज आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हकने सामन्याला सावध सुरुवात केली. मात्र नवव्या षटकात सलग दोन धक्के देत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ही जोडी फोडली. हार्दिक पांड्याने पहिल्यांदा बाबर आझमची विकेट घेतली त्यानंतर अक्षर पटेलच्या रॉकेट थ्रोने इमामचा खेळ संपवला. पाकिस्तानकडून साऊद शकीलने 76 चेंडूत 62 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 46 धावा केल्या. खुसदिल शाहने 38 धावा केल्या. बाबर आझमला फक्त 23 धावा करता आल्या

सलग दोन विकेट्स गेल्यानंतर पाकिस्तानच्या धावसंख्येला ब्रेक लागला. मोहमद शमी आणि हार्दिक पांड्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांना जखडून ठेवले. अशातही साऊद शकील आणि रिझवानने पाकिस्तानच्या  डावाला आकार देण्याचा प्रयत्न सऊद शकीलने आपली अर्धशतकी खेळी पूर्ण केली. त्याने 63 चेंडूंमध्ये आपले पाचवे आणि भारताविरुद्धचे पहिले अर्थशतक पूर्ण केले. 

IND Vs PAK: अक्षर पटेलचा खतरनाक 'रॉकेट थ्रो', इमामचा खेळ खल्लास; पाहा जबरदस्त VIDEO

मात्र डाव सावरत असतानाच हे दोन्ही खेळाडूही तंबुत परतले.  अक्षर पटेलने मोहम्मद रिझवानला आऊट केले. त्याने 77 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंतर हार्दिकने सउद शकीलचा काटा काढला. त्या पाठोपाठ रविंद्र जडेजाने तैयब ताहिरचा त्रिफळा उडवला आणि पाकिस्तानचा डाव पूर्णपणे गडगडला. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन, हार्दिक पांड्याने दोन आणि हर्षित राणा तसेच रविंद्र जडेजाने एक बळी घेतला. 

Advertisement