जाहिरात

IND Vs PAK: अक्षर पटेलचा खतरनाक 'रॉकेट थ्रो', इमामचा खेळ खल्लास; पाहा जबरदस्त VIDEO

हार्दिकने पहिला बाबर आझमचा बळी घेतल्यानंतर अक्षर पटेलने इमाम उल हकला जबरदस्त थ्रो करत धावचित केले, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

IND Vs PAK: अक्षर पटेलचा खतरनाक 'रॉकेट थ्रो', इमामचा खेळ खल्लास; पाहा जबरदस्त VIDEO
India Vs Pakistan 2025:

India vs Pakistan Live: भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील हायहोल्टेज लढतीला आता सुरुवात झाली आहे. सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या पाच षटकात पाकिस्तानने सावध सुरुवात केली मात्र नवव्या षटकामध्ये हार्दिक पांड्याने पाकिस्तानच्या डावाला ग्रहण लावले. हार्दिकने पहिला बाबर आझमचा बळी घेतल्यानंतर अक्षर पटेलने इमाम उल हकला जबरदस्त थ्रो करत धावचित केले, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बाबर आझमची विकेट गेल्याने पाकिस्तानची टीम दबावाखाली खेळत होती. याच प्रयत्नात इमाम उल हकने आपली विकेट गमावली. इमाम सामना पुढे नेण्याचा प्रयत्नात होता. त्यामुळे तो स्ट्राईक बदलण्याच्या तयारी होता.  त्याने कुलदीपच्या दुसऱ्या चेंडूवर मिड ऑनच्या दिशेने फटका मारला आणि धावत सुटला हा चेंडू थेट अक्षर पटेलच्या हातात गेला.

अक्षर पटेलने  चतुराई दाखवत नॉन स्ट्राईकच्या स्टंप अचूक हेरल्या आणि काही कळायच्या आत थ्रो केला. इमामने उडी मारून क्रिजमध्ये परतण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याच्या दांड्या गुल झाल्या होत्या. पंचांनीही तात्काळ त्याला आऊट दिले आणि मैदानात एकच जल्लोष सुरु झाला. सामन्याला आकार देण्याची जबाबदारी असलेला इमाम 26 चेंडूत फक्त 10 धावा करू शकला. 

दोन्ही संघांची प्लेईंग 11:

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.

पाकिस्तान संघ : इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद

India vs Pakistan LIVE Score: पाकिस्तानला दोन धक्के! हार्दिकने केली बाबरची शिकार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: