India Vs Pakistan Live: आज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील महामुकाबला म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हायहोल्टेज लढत होणार आहे. दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ आमने-सामने येतील. सुपरसंडेच्या या हायहोल्टेज लढतीकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष लागले आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारत आणि पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला होत असून सुपर संडेसाठी रोहित सेना सज्ज झाली आहे. दुबईमध्ये टीम इंडियाचे पारडे जड असून आत्तापर्यंत या मैदानावर भारतीय संघाने 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी सहा सामने भारतीय संघाने जिंकले असून एक सामना बरोबरीत झाला आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा या सामन्यावर टीम इंडिया विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील हा सुपर सामना क्रिडाप्रेमींना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येतील. टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवला जाईल तर JioHotstar च्या अँप तसेच वेब साईटवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग होईल. मोबाईवर हा सामना सामना JioHotstar च्या अँपवर फ्रीमध्ये पाहता येईल. रविवारी दुपारी 2: 30 वाजता हा सामना पार पडणार असून यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल.
नक्की वाचा - Sangli News: चक्क बैलांना बॉडीगार्ड! सांगलीच्या पठ्ठ्याची राज्यभर चर्चा, काय आहे प्रकरण?
पाहा दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन:
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.
पाकिस्तान संघ : इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद