
सांगली: बॉडीगार्ड्सच्या गराड्यात नेतेमंडळी, सेलिब्रिटींना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मात्र बैलांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्डची नेमणूक केल्याचं तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. मात्र सांगलीत असं घडलं आहे. सांगलीच्या एका पठ्ठ्याने आपल्या बैल जोडीसोबत बॉडीगार्ड ठेवले आहेत. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा सविस्तर
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील अंकुश खीलारी यांना आर्थिक यश प्राप्त होत नव्हते. अंकुश यांनी कर्नाटकमधील चिंचणी माय्याक्का देवीला साकडे घातले होते. माझं चांगले कर मी बैलगाडी घेऊन तुझ्या दर्शनाला येईन. त्यानंतर अंकुश यांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली.
देवीच्या आशीर्वादाने आपली आर्थिक भरभराट झाली अशी धारणा अंकुश यांची झाली. त्यामुळे अंकुश यांनी नवस केल्याप्रमाणे तो फेडण्यासाठी पायी प्रवास केला. आपल्या सोन्या आणि छब्या या बैलांसोबत त्यांनी माय्याक्का देवीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे बॉडीगार्ड्स घेऊन ते देवीच्या दर्शनाला गेले. आटपाडी करगणी ते मायक्का चिंचणी हे 125 किमीचं अंतर चालत जाऊन त्यांनी देवीचं दर्शन घेतले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...
चिंचणीमध्ये बॉडीगार्डसोबत बैलगाडी गर्दीत घुसली आणि बघ्यांची एकच गर्दी झाली. प्रत्येकजण त्यांच्यासोबत सेल्फी काढू लागले. बैलाचे बॉडीगार्ड पाहून लोकही चकीत होऊ लागले. पण या गर्दीत सहा बॉडीगार्ड्सनी बैलांना वाट काढून दिली. अशाप्रकारे अंकुश यांनी देवीचे दर्शन घेतले आणि आपला नवस फेडला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world