5 hours ago

India vs Pakistan LIVE Updates:  क्रिडाविश्वात सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरु आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील महामुकाबला म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज लढत झाली. या लढतीत भारताने पाकिस्तानला धुळ चारली. शिवाय स्पर्धेच्या उपात्य फेरीत ही धडक दिली आहे. पाकिस्तानच्या या पराभवामुळे त्यांचे स्पर्धेतले आवाहन संपुष्टात आले आहे. 

Feb 23, 2025 22:14 (IST)

IND VS Pak: जुन्या पराभवाचा वचपा काढला, भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष

विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून पाकिस्तानने 241 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 42. 3 षटकात चार गडी गमावत विजय संपादन केला. यासोबत भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये एन्ट्री केली असून पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. 

Feb 23, 2025 22:07 (IST)

India vs Pakistan: विराटचे शतक अन् टीम इंडियाचा दणक्यात विजय; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने दिलेले 242 धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पूर्ण केले. या लाजिरवाण्या पराभवासोबतच पाकिस्तानने या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे. विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला. विराटने शेवटपर्यंत फटकेबाजी करत जबरदस्त शतक झळकावले. तोच या सामन्याचा हिरो ठरला. विजयासाठी दोन धावांची गरज असताना कोहलीने खणखणीत चौकार ठोकत संघाचा विजय आणि त्याचे शतकही पूर्ण केले. टीम इंडियाने 42.3 ओव्हरमध्ये 244 धावा केल्या.

Feb 23, 2025 21:20 (IST)

IND VS PAK: टीम इंडियाच्या 200 धावा पूर्ण, विजयांपासून अवघ्या 42 धावा दूर

टीम इंडियाची विजयाकडे वाटचाल... विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीने भारतीय संघ विजयाकडे जाताना दिसत आहे. एकीकडे विराटने अर्थशतकी खेळी असतानाच श्रेय्यस अय्यरनेही दुसऱ्या बाजूने जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे टीम इंडियाने 35 षटकांमध्ये 200 धावांचा टप्पा पार केला आहे. आता विजयासाठी टीम इंडियाला अवघ्या 42 धावांची आवश्यकता आहे. 

Feb 23, 2025 20:41 (IST)

IND VS PAK: विराट कोहलीचे अर्धशतक, टीम इंडियाची विजयाकडे वाटचाल

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार अर्थशतकी खेळी पूर्ण केली आहे. यासोबतच विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.  कोहलीच्या या खेळीसोबतच भारतीय संघाचीही विजयाकडे वाटचाल सुरु झाली आहे. 

Advertisement
Feb 23, 2025 20:39 (IST)

Ind Vs Pak: टीम इंडिया मजबूत स्थितीत, विजयाकडे वाटचाल सुरु

पाकिस्तानने दिलेल्या 242 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 षटकांचा खेळ पूर्ण झाला असून 20 षटकांनंतर भारत पाकिस्तानपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. शेवटच्या पाच षटकांत फक्त 18 धावा झाल्या आहेत आणि एक विकेट पडली आहे.

Feb 23, 2025 20:31 (IST)

india Vs Pakistan: विराट कोहलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड, सचिन तेंडुलकरसह दिग्गजांना धोबीपछाड

या सामन्यापूर्वी, विराट कोहलीला एकदिवसीय सामन्यात 14 हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी 15 धावांची आवश्यकता होती.  विराटने आज 15 धावा केल्या तर तो एकदिवसीय सामन्यांमध्ये 300 पेक्षा कमी डावांमध्ये 14,000 धावा करणारा पहिला फलंदाज बनला. याशिवाय, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा आकडा गाठणारा तिसरा फलंदाज ठरला.

Advertisement
Feb 23, 2025 20:10 (IST)

Ind Vs Pak LIVE: टीम इंडियाला दुसरा धक्का, शुभमन गिलचा त्रिफळा उडवला

टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली असून 100 धावा पूर्ण केल्यात. अशातच शुभमन गिलच्या रुपाने भारतीय संघाला दुसरा धक्का बसला. शुभमन गिलने आक्रमकपणे 43 धावांची खेळी केली, मात्र अर्धशतकाकडे वाटचाल सुरु असतानाच तो क्लिनबोल्ड झाला... 

Feb 23, 2025 19:49 (IST)

India Vs Pakistan: टीम इंडियाची सावध सुरुवात, शुभमन गिलची फटकेबाजी

पहिला पॉवरप्ले संपला. यामध्ये भारताने 1 विकेट गमावून 63 धावा केल्या आहेत. भारत मजबूत स्थितीत आहे. शुभमन गिल आज आक्रमकपणे खेळत आहे. आतापर्यंत त्याने सात चौकार मारले आहेत. जर गिल असाच खेळत राहिला तर भारतीय संघ हा सामना 40 षटकांच्या आत जिंकेल.

Advertisement
Feb 23, 2025 19:16 (IST)

IND Vs PAK LIVE: भारतीय संघाला पहिला धक्का! रोहित शर्मा क्लिन बोल्ड

डावाच्या सुरुवातीला आक्रमक सुरुवात केल्यानंतर  भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्माचा बळी घेत शाहीन आफरीदीने भारतीय संघाला पहिला धक्का दिला. रोहितने 15 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या. 

Feb 23, 2025 19:09 (IST)

IND VS PAK: रोहित शर्माची आक्रमक सुरुवात! टीम इंडियाने जोडल्या 26 धावा

पाकिस्तानचे 242 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. कर्णधार रोहित शर्माने आल्या आल्या फटकेबाजीला सुरुवात केली असून एक फोर आणि एक कडक सिक्स लगावत आपले इरादे स्पष्ट केलेत. टीम इंडियाने 3 षटकात  20 धावाही पूर्ण केल्यात. 

Feb 23, 2025 18:53 (IST)

IND Vs Pakistan LIVE: भारतीय संघाच्या डावाला सुरुवात, शुभमन- रोहित शर्मा मैदानात

पाकिस्तानला गुंडाळल्यानंतर भारतीय संघाच्या डावाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचे सलामवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा मैदानावर उतरलेत. 

Feb 23, 2025 18:47 (IST)

India VS Pakistan LIVE: भारतीय संघापुढे 242 धावांचे टार्गेट

नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पाकिस्तानने 47 धावांवर बाबर आझम आणि इमाम उल हक यांचे बळी गमावले. पण यानंतर सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी संघाच्या डावाची जबाबदारी घेतली. तथापि, दोघांनीही खूप हळू फलंदाजी केली. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करून संघाला पुन्हा एकदा मार्गावर आणले. पण अक्षर पटेलने ही भागीदारी मोडली आणि रिझवानला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रिझवान 77 चेंडूत 46 धावा करून बाद झाला.

Feb 23, 2025 18:42 (IST)

india Vs Pakistan LIVE: विराट कोहलीचा नवा विक्रम, सर्वाधिक कॅच घेणारा भारतीय फलंदाज

भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने नवा इतिहास रचला आहे. विराट आता भारतासाठी क्षेत्ररक्षक म्हणून एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले आहे.

एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू:

 विराट कोहली: 157

 मोहम्मद अझरुद्दीन: 156

 सचिन तेंडुलकर: 140

 राहुल द्रविड: 124

 सुरेश रैना: 102

Feb 23, 2025 18:40 (IST)

Ind VS Pak LIVE: कुलदीप यादव पांड्याचा भेदक मारा, पाकिस्तानला रोखले

टीम इंडियासाठी कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या यांनी शानदार कामगिरी केली. कुलदीपने 3 आणि पंड्याने 1 विकेट घेतल्या. पटेल, जडेजा आणि हर्षित राणा यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

Feb 23, 2025 18:38 (IST)

Ind VS Pak: पाकिस्तानचा संघ ऑलआऊट, टीम इंडियापुढे 242 धावांचे टार्गेट

टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने जबरदस्त पाकिस्तानला 241 धावांवर रोखले. यासोबतच टीम इंडियाला विजयासाठी 50 षटकांमध्ये 242 धावांची गरज आहे.

Feb 23, 2025 18:05 (IST)

Live Update: पाकिस्तानला आठवा धक्का.. नसीम शाह 14 धावा करुन आऊट

पाकिस्तानला आठवा धक्का.. नसीम शाह 14 धावा करुन आऊट

Feb 23, 2025 17:54 (IST)

IND VS AUS: कुलदीप यादवचे सलग दोन धक्के! पाकिस्तानचा संघ अडचणीत

कुलदीप यादवने एकाच षटकात आधी सलमान आगाला आऊट केले, त्यानंतर शाहीन आफरीदीचा बळी घेतला. यासोबतच पाकिस्तानच्या संघाने 44 षटकांमध्ये 206 धावा पूर्ण केल्यात. 

Feb 23, 2025 17:50 (IST)

IND VS PAK LIVE: पाकिस्तानची दाणादाण, 7 फलंदाज आऊट

टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची दाणादाण उडाली असून 200 धावांमध्ये सात फलंदाज तंबुत परतलेत. कुलदीप यादवच्या एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स गेल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अडचणीत आला आहे. 

Feb 23, 2025 17:28 (IST)

India Vs Pakistan: पाकिस्तानला सलग 3 धक्के, निम्मा संघ तंबुत

पाकिस्तानचा डाव सावरत असतानाच टीम इंडियाने दोन धक्के दिलेत. सुरुवातीला अक्षर पटेलने मोहम्मद रिझवानला आऊट केले.  त्यानंतर हार्दिकने सउद शकीलचा काटा काढला. त्या पाठोपाठ रविंद्र जडेजाने तैयब ताहिरचा त्रिफळा उडवला. यासोबतच पाकिस्तानचा निम्मा संघ तंबुत परतला असून 37 षटकात 169 धावा करत 5 गडी गमावलेत.

Feb 23, 2025 17:21 (IST)

IND Vs Pak LIVE: पाकिस्तानचा डाव गडगडला! पाच फलंदाज तंबुत

पाकिस्तानचा डाव सावरत असतानाच टीम इंडियाने दोन धक्के दिलेत. सुरुवातीला अक्षर पटेलने मोहम्मद रिझवानला आऊट केले. त्याने 77 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंतर हार्दिकने सउद शकीलचा काटा काढला. या विकेट्सोबतच पाकिस्तानची धावसंख्या 35 ओव्हरनंतर 164 वर केली असून चार गडी गमावलेत.

Feb 23, 2025 17:07 (IST)

IND VS Pak: सऊदची अर्थशतकी खेळी, टीम इंडिया विकेटच्या प्रतिक्षेत

पाकिस्तानच्या दोन फलंदाजांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला असून साऊद शकील आणि रिजवानमध्ये शतकी भागेदारी होताना दिसत आहे. सऊद शकीलने आपली अर्धशतकी खेळी पूर्ण केली असून त्याने 63 चेंडूंमध्ये आपले पाचवे आणि भारताविरुद्धचे पहिले अर्थशतक पूर्ण केले आहे. त्यापाठोपाठ रिझवानही अर्थशतकाच्या जवळ आहे. 

Feb 23, 2025 16:51 (IST)

IND Vs Pak LIVE: शकील- रिझवानमध्ये अर्थशतकी भागिदारी, साऊदचे अर्धशतक

पाकिस्तानचे फलंदाज मोहम्मद रिझवान आणि साऊद शकीलने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये 50 पेक्षा जास्त धावांची भागेदारी जाली आहे. सध्या रिझवानने 68 चेंडू खेळत 40 धावा केल्या असून साऊद शकीलने 60 चेंडूत 44 धावांवर खेळत आहे. यासोबतच पाकिस्तानने 30 षटकांनंतर 136 धावा केल्या आहेत. 

Feb 23, 2025 16:35 (IST)

IND Vs PAK LIVE: निम्म्या डावानंतर पाकिस्तानचे अखेर शतक! 26 षटकात 111 धावा

कुलदीप यादवच्या शेवटच्या षटकात फक्त ४ धावा आल्या आहेत. नॉन-स्ट्राइक एंडवर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर थेट थ्रो झाला, पण सौद शकील तिथे सहज पोहोचला. शकील आणि रिझवान यांच्यातील भागीदारी ५० धावांच्या जवळ पोहोचली असून 26 षटकांनंतर पाकिस्तानने शतक पूर्ण केले आहे. पाकने 26 षटकात 111 धावा करत दोन बळी गमावलेत.

Feb 23, 2025 16:32 (IST)

IND Vs PAK: हार्दिक पांड्या- शमीचा भेदक मारा, पाकिस्तानचे फलंदाज गोंधळात

 रिझवान आणि सौद शकील चौकार मारण्याचा प्रयत्नही करत नाहीत. ३३ चेंडू झाले, तरीही एकही चौकार मारलेला नाही. 60 चेंडूत फक्त २ चौकार मारले गेले आहेत. . शमी आणि पंड्याने पाकिस्तानला अडचणीत आणले आहे. पंड्याने 4 षटकांत फक्त 14 धावा दिल्या आहेत. तर शमीने 18 धावा खर्च केल्या आहेत.

Feb 23, 2025 16:28 (IST)

IND VS PAK LIVE: पाकिस्तानचा संथ खेळ, मोहमद शमी-हार्दिक पुढे कात टाकली

भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने संथ खेळी सुरु केली आहे. 20 षटके झाल्यानंतरही पाकिस्तानने फक्त 71 धावा केल्या, ज्यामुळे त्यांची रणनिती काय? हे समजण्यापलिकडे आहे. 

Feb 23, 2025 16:21 (IST)

India Vs Pakistan: पाकिस्तानने डाव सावरला, किती झाल्या धावा

हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलने दिलेल्या मोठ्या धक्क्यानंतर पाकिस्तानने सावध खेळ करत डाव सावरला आहे. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि सउद शकील सध्या मैदानावर खेळत असून संघाच्या 22 षटकात 86 धावा केल्या आहेत. 

Feb 23, 2025 15:26 (IST)

Ind Vs Pak Live: हार्दिक पांड्या अक्षरची कमाल! पाकिस्तानला लागोपाठ दोन धक्के

सामन्याच्या नवव्या षटकात पाकिस्तानला पहिला धक्का बसला. हार्दिक पांड्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाबर आझमची शिकार केली, त्यानंतर अक्षर पटेलच्या रॉकेट थ्रोने इमामचा खेळ संपवला. सामन्यात 10 षटकानंतर पाकिस्तानने 52 धावा करत दोन बळी घेतलेत. बाबर आझमने  26 चेंडूत पाच चौकारांसह 23 धावा केल्या. 

Feb 23, 2025 15:15 (IST)

India VS Pakistan: पाकिस्तानला पहिला धक्का! बाबर आझम आऊट

पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हक मैदानात उतरलेत. पाकिस्तानने पहिल्या आठ षटकांमध्ये 41 धावा केल्या असून पहिला धक्का बसला आहे. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर पाकिस्तानने पहिली विकेट गमावली आहे. बाबर आझमच्या रुपाने पहिला धक्का दिला आहे. 

Feb 23, 2025 14:47 (IST)

IND Vs Pak LIVE: क्रिकेटच्या महायुद्धाला सुरुवात, बाबर-इमाम मैदानात

भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या हायहोल्टेज लढतीला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून त्यांची सलामीची जोडी मैदानावर आली आहे. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इमाम उल हक मैदानात उतरलेत. मोहम्मद शमी पहिली ओव्हर टाकत आहे.

Feb 23, 2025 14:18 (IST)

India Vs Pakistan Playing 11: मोठ्या सामन्यात धाडसी निर्णय, जाणून घ्या टीम इंडियाची प्लेईंग 11

भारत आणि पाकिस्तानमधील महामुकाबला थोड्याच वेळात सुरु होणार आहे. 

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.

पाकिस्तान संघ : इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद


Feb 23, 2025 14:04 (IST)

IND Vs PAK TOSS: नाणेफेकीचा कौल पाकिस्तानने जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

भारत पाकिस्तान सामन्यासाठी नाणेफेक पार पडली आहे. या महत्वाच्या लढतीत नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला असून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Feb 23, 2025 14:00 (IST)

IND Vs PAK: दोन्ही संघाच्या खेळाडूंचे स्टेडियममध्ये आगमन

भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी दोन्ही संघांचे दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर आगमन झाले आहे. दोन्ही संघाचे खेळाडू बसेसमधून मैदानावर पोहोचले आहेत, महत्वाचं म्हणजे जसप्रीत बुमराहसुद्धा या हायहोल्टेज सामन्यासाठी दुबईत दाखल झाला आहे. 

Feb 23, 2025 13:50 (IST)

IND Vs PAK: दुबईत टीम इंडिया अजिंक्य; कोणाचे पारडे जड?

भारत आणि पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला होत असून सुपर संडेसाठी रोहित सेना सज्ज झाली आहे. दुबईमध्ये टीम इंडियाचे पारडे जड असून आत्तापर्यंत या मैदानावर भारतीय संघाने 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी सहा सामने भारतीय संघाने जिंकले असून एक सामना बरोबरीत झाला आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा या सामन्यावर टीम इंडिया विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Feb 23, 2025 13:42 (IST)

IND VS PAK Live: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना फुकट कसा पाहाल? वाचा एका क्लिकवर....

भारत आणि पाकिस्तानमधील हा सुपर सामना क्रिडाप्रेमींना  टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येईल.  चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येतील. टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवला जाईल तर JioHotstar च्या अँप तसेच वेब साईटवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग होईल. मोबाईवर हा सामना सामना JioHotstar च्या अँपवर फ्रीमध्ये पाहता येईल. रविवारी दुपारी 2: 30 वाजता हा सामना पार पडणार असून यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल.

Feb 23, 2025 13:41 (IST)

IND Vs Pak Live: भारत विरुद्ध पाकिस्तान! पाहा दोन्ही संघांची प्लेईंग 11

टीम इंडियाची प्लेइंग  संभाव्य इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.

 पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: - इमाम उल हक, उस्मान खान, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आगा, तय्यब ताहिर / कामरान गुलाम, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.

Feb 23, 2025 13:39 (IST)

India Vs Pakistan: दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा; बरोबरीत सुटला तर काय होणार?

भारत आणि पाकिस्तानमध्ये आज महामुकाबला होत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वाचा असणार आहे.  पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी हा सामना जिंकायचा आहे. तर त्याचवेळी भारतीय संघ पाकिस्तानला धूळ चारुन उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करु इच्छितो. जर सामना बरोबर राहिला तर सुपर ओव्हर होईल.