India Vs Pakistan Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हायहोल्टेज लढत होत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीने नवा विक्रम केला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय संघाचा पहिला खेळाडू बनला आहे. यामध्ये त्याने माजी दिग्गज कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले आहे. यासोबत विराटने वनडेमध्ये 14, 000 धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 156 झेल घेतले होते. आज (23 फेब्रुवारी) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नसीम शाहला झेलल्यानंतर विराट कोहलीच्या झेलची संख्या 157 झाली आहे. यासह, तो देशासाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल घेणारा पहिला खेळाडू बनला आहे.
या दोन दिग्गजांनंतर तिसरे स्थान सचिन तेंडुलकरचे आहे. सचिनने देशासाठी एकदिवसीय सामन्यात 140 झेल घेतले आहेत. राहुल द्रविड १२६ झेलांसह चौथ्या स्थानावर आहे. सुरेश रैनाचे नाव पाचव्या स्थानावर आहे. ज्याने 102 झेल घेतले आहेत. हे असे खेळाडू आहेत ज्यांनी यष्टीरक्षक म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून झेल घेतले.
IND Vs PAK: अक्षर पटेलचा खतरनाक 'रॉकेट थ्रो', इमामचा खेळ खल्लास; पाहा जबरदस्त VIDEO
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना आज दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. जिथे विराट कोहलीने शानदार क्षेत्ररक्षण करून दोन झेल घेतले आहेत. प्रथम, त्याने हर्षित राणाच्या चेंडूवर खुसदिल शाहला झेल देऊन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर, त्याने कुलदीप यादवच्या षटकात नसीम शाहला झेलबाद केले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये जाण्यास भाग पाडले.
एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू:
विराट कोहली: 157
मोहम्मद अझरुद्दीन: 156
सचिन तेंडुलकर: 140
राहुल द्रविड: 124
सुरेश रैना: 102
या सामन्यापूर्वी, विराट कोहलीला एकदिवसीय सामन्यात 14 हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी 15 धावांची आवश्यकता होती. विराटने आज 15 धावा केल्या तर तो एकदिवसीय सामन्यांमध्ये 300 पेक्षा कमी डावांमध्ये 14,000 धावा करणारा पहिला फलंदाज बनला. याशिवाय, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा आकडा गाठणारा तिसरा फलंदाज ठरला.