India Vs Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होत असून टीम इंडियाने विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. पाकिस्तानच्या 242 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीलाच मोठे फटके लगावत आपले इरादे स्पष्ट केले. या सामन्यात त्याला मोठी खेळी उभारता आली नाही मात्र हिटमॅनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात खाते उघडताच रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून 9000 धावा पूर्ण केल्या. त्याने फक्त 181 डावांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा ओलांडला, जो सर्वात जलद वेळेत हा आकडा गाठण्याचा एक नवीन विश्वविक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम भारतीय क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या नावावर होता ज्याने 9000 धावा पूर्ण करण्यासाठी 197 डाव घेतले होते. आता रोहित शर्माने त्याच्या आधीचा हा विक्रम मोडला आहे आणि तो स्वतःच्या नावावर केला आहे.
सचिन व्यतिरिक्त, रोहित शर्माने सौरव गांगुली, ख्रिस गेल, अॅडम गिलख्रिस्ट आणि सनथ जयसूर्या सारख्या दिग्गज सलामीवीरांनाही मागे टाकले आहे. एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून 9000 धावा पूर्ण करण्यासाठी सौरव गांगुलीने 231 डाव, ख्रिस गेलने 246 डाव, अॅडम गिलख्रिस्टने 253 डाव आणि सनथ जयसूर्याने 268 डाव खेळले. रोहित शर्माने हा विक्रम मोडणे हे विशेषतः महत्वाचे आहे कारण त्याने ही कामगिरी अशा वेळी केली आहे जेव्हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावा काढण्याचे दबाव खूप वाढले आहे.
IND Vs PAK: अक्षर पटेलचा खतरनाक 'रॉकेट थ्रो', इमामचा खेळ खल्लास; पाहा जबरदस्त VIDEO
या सामन्यात रोहित शर्मा मोठी खेळी खेळू शकला नाही. त्याने 15 चेंडूंचा सामना केला आणि 20 धावा केल्या. याखेळीत त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण त्याला या सुरुवातीचा फारसा फायदा घेता आला नाही आणि तो शाहीन आफ्रिदीचा बळी ठरला. शाहीन आफ्रिदीने त्याला क्लीन बोल्ड केले.