IND vs SA Final : टीम इंडियाचं फायनलपूर्वी टेन्शन वाढलं,सर्वात मोठ्या पनौतीशी होणार सामना

T20 World Cup Final : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या फायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Team India File Image (@AFP)
मुंबई:

T20 World Cup 2024 : रोहित शर्माचं दमदार अर्धशतक, कुलदीप यादव आणि अक्षर पटेलची स्पिन बॉलिंग यांच्या जोरावर भारतानं इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये पराभव केला.आता टी20 वर्ल्ड कपच्या फाययनलमध्ये भारताची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. टीम इंडियानं 2014 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेची फायनल गाठलीय. तर दक्षिण आफ्रिका कोणत्याही टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदांच खेळणार आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या स्पर्धेत दोन्ही टीमनं एकही सामना गमावलेला नाही. आता फायनलमध्ये एकाचं स्वप्न पूर्ण होईल. तर दुसऱ्या टीमचा अपेक्षाभंग होईल. भारतीय क्रिकेट टीमनं या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहेत. आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ शनिवारी संपेल अशी आशा भारतीय फॅन्सना आहे. पण, त्यापूर्वी भारतीय टीमला एक मोठा धक्का बसला आहे.गेल्या काही वर्षांपासून आयसीसीच्या नॉक आऊट मॅचमध्ये भारतीय टीमसाठी पनौती सिद्ध झालेले रिचर्ड केटलब्रॉ फायनलसाठी अंपायर्स पॅनलचे सदस्य आहेत.     

फायनलसाठी अंपायर निश्चित

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी आयसीसीनं अंपायर पॅनलची घोषणा केली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या फायनलसाठी न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे दोन मैदानात अंपायर असतील. तर, रिचर्ड केटलब्रॉ यांना टीव्ही अंपायर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहेत. रॉडने टकर चौथे अंपायर आहेत. आयसीसी स्पर्धेतील ज्या नॉक आऊट मॅचमध्ये रिचर्ड केटलब्रॉ अंपायर होते ती मॅच भारतीय टीमला जिंकता आलेला नाही. यंदा हे दुष्टचक्र तोडण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल. 

( नक्की वाचा : IND vs ENG : भारतीय बॉलरनं घेतली अजब हॅटट्रिक, तुमच्या लक्षात आली का? )

भारतीय टीमसाठी पनौती

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्ये रिचर्ड मैदानातील अंपायर होते. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावलेली भारतीय टीम फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली. 2021 साली झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायलमध्ये टीम इंडिया न्यूझीलंडकडून पराभूत झाली होती. रिचर्ड त्या मॅचमध्ये टीव्ही अंपायर होते. 

Advertisement

Photo Credit: IANS

यापूर्वी 2019 साली वन-डे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. त्या मॅचमध्ये रिचर्ड मैदानात अंपायर होते. 2015 वन-डे वर्ल्ड कपमध्ये भारताचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं होतं. त्या मॅचममध्येही रिचर्ड मैदानातील अंपायर होते. इतकंच नाही तर 2017 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2014 मधील टी20 वर्ल्ड कप फायनल, 2016 मधील टी20 वर्ल्ड कप सेमी फायनल या प्रत्येक मॅचमध्ये भारतीय टीम पराभूत झाली होती. त्यावेळी देखील रिचर्ड मैदानात अंपायर होते.