Suryakumar Yadav Emotional Video : टीम इंडियाचा तरुण बॅटर तिलक वर्मानं (Tilak Varma) पुन्हा एकदा कॅप्टन सूर्यकुमार यादवचा विश्वास सार्थ ठरवला. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात झालेल्या चौथ्या T20 मॅचमध्ये तिलकनं 47 बॉलचा सामना केला. त्यानं तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करताना 255.32 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 120 रन काढले. ही खेळी पाहून सूर्यकुमार इमोशनल झाला होता. यावेळी त्याच्या डोळ्यात दु:खाचे नाही तर आनंदाचे अश्रृ होते.
या सीरिजमधील दुसरा T20 सामना संपल्यानंतर तिलकनं सूर्याची त्याच्या रुममध्ये जाऊन भेट घेतली होती. मला टीम इंडियाच्या विजयात योगदान द्यायचं आहे. त्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळू दे, अशी विनंती तिलकनं कॅप्टनकडं केली होती. सूर्यानं ही विनंती मान्य केली आणि तिलकला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली. टीम इंडियाच्या तरुण खेळाडूनं या संधीचं सोनं करत सलग दोन सेंच्युरी झळकावल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कदाचित याच कारणामुळे तिलक आणि संजू टीम इंडियाची इनिंग संपल्यानंतर पॅव्हिलियनमध्ये परतत होता. त्यावेळी टीममधील अन्य खेळाडू टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत होते. त्यावेळी सूर्या त्याच्या डोळ्यातील अश्रू लपवताना दिसला. एका तरुण खेळाडूला आपण संधी दिली त्यानं सलग दोन मॅचमध्ये दमदार खेळ केला, याबाबद्दल त्याला आनंद झाला होता.
दुसराच खेळाडू
सूर्यकुमार यादवनं संधी दिल्यानंतर तिलक वर्मानं तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करत सलग दोन मॅचमध्ये सेंच्युरी झळकावली आहे. तो T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सलग दोन सेंच्युरी झळकावणारा दुसरा खेळाडू बनलाय. यापूर्वी फक्त संजू सॅमसननं हा पराक्रम केला आहे.