जाहिरात

IPL 2025 : काय सांगता! 13 वर्षांच्या वैभववर लागणार आयपीएलमध्ये बोली, भारताकडून झळकावलीय सेंच्युरी

आगामी आयपीएल सिझनसाठी (IPL 2025) होणाऱ्या ऑक्शनसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या यादीमध्ये 13 वर्षांच्या खेळाडूचा समावेश आहे.

IPL 2025 : काय सांगता! 13 वर्षांच्या वैभववर लागणार आयपीएलमध्ये बोली, भारताकडून झळकावलीय सेंच्युरी

IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही जगातील सर्वात प्रतिष्ठेची T20 क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील क्रिकेटपटू धडपड करत असतात. वयाच्या 42 व्या वर्षी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणारा जेम्स अँडरसन हे त्याचं प्रमुख उदाहरण आहे. अँडरसन यंदा आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये स्वत:चं नशीब आजमवणार आहे. आगामी आयपीएल सिझनसाठी (IPL 2025) होणाऱ्या ऑक्शसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयनं प्रसिद्ध केलीय. त्यामध्ये चक्क 13 वर्षांच्या खेळाडूचा समावेश आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफी POK मध्ये जाणार नाही, ICC चा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आदेश आदेश

(नक्की वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफी POK मध्ये जाणार नाही, ICC चा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आदेश आदेश)

कोण आहे 13 वर्षांचा खेळाडू?

आयपीएल मेगा ऑक्शनसाठी शॉर्टलिस्ट झालेला 13 वर्षांचा खेळाडू हा भारतीय आहे. त्यानं राज्य तसंच देशांतर्गत स्पर्धा गाजवल्यानंतर भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरीही झळकावलीय. या कामगिरीच्या जोरावरच तो या खडतर लीगमधील तितक्याच चुरशीच्या ऑक्शनसाठी शॉर्टलिस्ट झालाय. 

वैभव सूर्यवंशी असं या खेळाडूचं नाव आहे. तो बिहार राज्यातील समस्तीपूरचा आहे. वयाच्या पाचव्या वर्षांपासून क्रिकेट खेळण्यास सुरु केलेल्या वैभवनं कूचबिबहार ट्रॉफी, विनू मंकड करंडक या देशातील स्पर्धा गाजवल्या आहेत. त्यानंतर त्यानं रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केलं. 

वैभवनं आत्तापर्यंत 5 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या असून त्यामध्ये 10 च्या सरासरीनं 100 रन केले आहेत. 41 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर आहे. 

मुंबई इंडियन्सच्या माजी बॉलरची ऐतिहासिक कामगिरी एकाच इनिंगमध्ये घेतल्या 10 विकेट्स

(नक्की वाचा: मुंबई इंडियन्सच्या माजी बॉलरची ऐतिहासिक कामगिरी एकाच इनिंगमध्ये घेतल्या 10 विकेट्स)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरी

वैभवचं नाव खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलिया A विरुद्ध झळकावलेल्या सेंच्युरीमुळे चर्चेत आलं. त्यानं इंडिया अंडर 19 टीमकडून खेळताना ही कामगिरी केली. वैभवनं त्या इनिंगमध्ये फक्त 58 बॉलमध्येच सेंच्युरी झळकावली होती. त्यानं ऑस्ट्रेलिया A विरुद्ध 64 बॉलमध्ये 104 रन काढले. त्यामध्ये 14 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. 

आयपीएलमधील अनेक फ्रँचायझी भविष्याचा विचार करुन तरुण खेळाडूंमध्ये गुंतवणूक करतात. अंडर 19 वर्ल्ड कप गाजवलेल्या अनेक खेळाडूंना तातडीनं आयपीएल ऑक्शनमध्ये चांगली बोली लागली आहे. आयपीएल टीम्सना या गुंतवणुकीचा फायदा झालाय. ऋषभ पंत, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल ते अगदी विराट कोहली ही याची प्रमुख उदाहरणं आहेत. आता या परंपरेत दाखल होणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू होण्याची संधी वैभवला आहे. त्याला या संधीचा फायदा मिळतो का हे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियात होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये स्पष्ट होईल.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com