U19 World Cup 2026 : टीम इंडियाचा विजेतेपदाचा सिक्सर! इंग्लंडला दणदणीत पराभूत करत पटकावले विजेतेपद

U19 World Cup 2026 : टीम इंडियाच्या अंडर 19 टीमनं वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

U19 World Cup 2026 : टीम इंडियाच्या अंडर 19 टीमनं वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. हरारेमध्ये झालेल्या फायनलमध्ये भारतानं इंग्लंडचा 100  रन्सनं दणदणीत पराभव केला. भारताने दिलेलं 412 रन्सचं आव्हान इंग्लंडला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 311 रन्सवर ऑल आऊट झाली.

भारतीय टीमनं अंडर 19 वर्ल्ड कप सहाव्यांदा जिंकला आहे. भारतानं ही स्पर्धा यापूर्वी पाचवेळा   (2000, 2008, 2012, 2018, 2022) जिंकली होती.   वैभव सूर्यवंशीचे विक्रमी 175 रन्स हे सहाव्या विजेतेपदाचे वैशिष्ट्य ठरले.  

अंडर 19 वर्ल्ड कप जिंकणारे भारतीय कॅप्टन

मोहम्मद कैफ - 2000
विराट कोहली - 2008
उन्मुक्त चंद - 2012
पृथ्वी शॉ - 2018
यश ढुल - 2022
आयुष म्हात्रे - 2026

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi :अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये वैभवचं वादळ, फक्त 30 बॉलमध्ये ठोकले 150 रन्स! )


टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरुवात चांगली नव्हती. पण, वैभवच्या खेळीनं इंग्लंडची दाणादाण उडाली. वैभव बॅटिंग करत असताना 10 च्या रनरेटनं रन्स होत होते. भारतानं पहिल्या 25 ओव्हर्समध्ये 250 रन्स केले होते. त 

Advertisement

अंडर 19 वर्ल्ड कपच्या प्ले ऑफमध्ये 350 पेक्षा जास्त रन करणारी टीम इंडिया ही पहिली टीम बनली आहे. यापूर्वीचा रेकॉर्डही भारताच्याच नावावर होता. 2016 साली भारतानं नामिबियाविरुद्ध 6 आऊट 349 रन्स केले होते. 

Topics mentioned in this article