Vaibhav Suryavanshi Under 19 World Cup Final 2026: टीम इंडियाचा 14 वर्षांचा छोटा सुपरस्टार वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा इतिहास रचलाय. प्रत्येक स्पर्धेत आपल्या बॅटनं सर्वांना चकित करणाऱ्या वैभवनं अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भीम पराक्रम केला. हरारेमध्ये इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या फायनलमध्ये वैभवनं फक्त 55 बॉलमध्ये शानदार सेंच्युरी झळकावली.
विक्रमी सेंच्युरी
अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने वादळी बॅटिंग करत इतिहास रचला आहे. त्याने केवळ 55 बॉलमध्ये 8 चौकार आणि 8 उत्तुंग सिक्स मारत आपली सेंच्युरी पूर्ण केली. वैभवने अल्बर्टने टाकलेल्या डावातील 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सिंगल घेतला आणि सेंच्युरी पूर्ण या सामन्यात भारताने टॉस जिंकून आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता जो वैभवने सार्थ ठरवला आहे.
वैभवचा सेंच्युरीनंतरही धडाका सुरुच होता. त्याची आक्रमक बॅटिंग पाहून तो फायनलमध्ये डबल सेंच्युरी करेल असंच सर्वांना वाटत होतं. पण तो 175 वर आऊट झाला. त्यानं फक्त 80 बॉलमध्ये 15 फोर आणि 15 सिक्सच्या मदतीनं 175 रन्स केले. म्हणजेच त्यानं फक्त 30 बॉलमध्ये 175 पैकी 150 रन्स केले आहेत.
Towering SIXES! 💥
— Star Sports (@StarSportsIndia) February 6, 2026
2nd Most 100s for IND in YODIs! 💯
Jaw-dropping strokeplay! 🤩
Vaibhav Sooryavanshi has completed his century & what an occasion to bring it up! 🇮🇳🫰🏻🙌🏻
ICC Men's #U19WorldCup | FINAL | #INDvENG | LIVE NOW 👉 https://t.co/ZFk8pN9tv3 pic.twitter.com/7eRy33zUXr
रेकॉर्ड्सचा पाऊस
या शतकी खेळीसोबतच वैभव सूर्यवंशीने रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला आहे. अंडर 19 वर्ल्ड कपच्या एकाच एडिशनमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आता वैभवच्या नावावर जमा झाला आहे. त्याने 14.1 ओव्हरमध्ये फिरकीपटू फरहान अहमदच्या बॉलवर लॉन्ग ऑफच्या वरून सिक्स मारत डेवाल्ड ब्रेविसचा रेकॉर्ड मोडीत काढला. बेबी एबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेविसने 2022 मध्ये 6 सामन्यात 20 सिक्स मारले होते, पण वैभवने या स्पर्धेत त्याला मागे टाकले आहे.
( नक्की वाचा : WPL 2026 Final : EE Sala Cup Namdu! स्मृती मंधनाच्या तडाख्यामुळे RCB चॅम्पियन! दिल्लीची सलग चौथ्यांदा निराशा )
विराट आणि शुभमन गिललाही टाकले मागे
वैभवने या खेळीदरम्यान दिग्गज भारतीय खेळाडूंनाही मागे टाकले आहे. 2008 च्या वर्ल्ड कपमधील तन्मय श्रीवास्तवचा रेकॉर्ड मोडीत काढत तो यूथ वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक रन बनवणारा तिसरा बॅटर ठरला आहे. फायनल सामन्यापूर्वी वैभवला हा टप्पा गाठण्यासाठी 80 रनची गरज होती, जी त्याने सहज पूर्ण केली. या स्पर्धेत त्याने यापूर्वीच विराट कोहली, शुभमन गिल, सरफराज खान आणि उन्मुक्त चंद यांसारख्या मोठ्या खेळाडूंच्या धावांचे रेकॉर्ड्स मागे टाकले आहेत.
( नक्की वाचा : Smriti Mandhana आणि Palash Muchhal चं लग्न का मोडलं? अभिनेत्यानं सांगितलं सांगलीमध्ये 'त्या' दिवशी काय घडलं? )
भारत आणि इंग्लंड पुन्हा एकदा समोरासमोर
अंडर 19 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड हे दुसऱ्यांदा फायनलमध्ये आमनेसामने आले आहेत. यापूर्वी 2022 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये या दोन टीम्समध्ये लढत झाली होती. विशेष म्हणजे या चालू वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्स एकही सामना न हारता फायनलपर्यंत पोहोचल्या आहेत.
भारतीय टीम आपला 10 वा फायनल सामना खेळत आहे, तर इंग्लंडची टीम सहाव्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. भारताने आतापर्यंत 5 वेळा हे विजेतेपद मिळवले आहे, तर इंग्लंडला 1998 नंतर दुसऱ्या ट्रॉफीची प्रतीक्षा आहे. भारताने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या 311 रनच्या आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळवला होता, तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 27 रननी हरवून फायनलचे तिकीट मिळवले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world