India Squad For Women's T20 World Cup 2026: इंग्लंड आणि वेल्सच्या मैदानावर रंगणाऱ्या T20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय महिला क्रिकेट टीमची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने शनिवारी जाहीर केलेल्या या 15 सदस्यीय संघात अनेक दिग्गज नावांचा समावेश असला, तरी एका नावाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. ते नाव म्हणजे महाराष्ट्राच्या अमरावतीची लेक भारती फुलमाळी. तब्बल 7 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आणि संघर्षाच्या अग्निपरीक्षेनंतर भारती थेट वर्ल्ड कपच्या रणांगणात उतरणार आहे.
अमरावती ते वर्ल्ड कप: एक थक्क करणारा प्रवास
अमरावतीमध्ये जन्मलेली भारती फुलमाळी ही विदर्भाच्या क्रिकेट वर्तुळातील एक आक्रमक बॅटर म्हणून ओळखली जाते. 11 ऑक्टोबर 1994 रोजी जन्मलेली भारती केवळ उजव्या हाताची स्फोटक बॅटर असून ती मध्यमगती बॉलिंग करते. 2019 मध्ये भारताकडून 2 टी-20 सामने खेळल्यानंतर ती अचानक मुख्य प्रवाहातून गायब झाली होती. मात्र, तिने हार न मानता पुन्हा एकदा शून्यातून विश्व उभे केले आणि 2026 च्या वर्ल्ड कप टीममध्ये दिमाखात जागा मिळवली.
वृत्तपत्रातील जाहिराती आणि सरकारी नोकरीचा शोध
भारतीचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. जानेवारी 2023 पर्यंत भारतीची सकाळ ही वृत्तपत्रांमधील नोकरीच्या जाहिराती पाहण्यात जायची. तिचे वडील शिक्षक असून ते कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. वडिलांची निवृत्ती जवळ आल्यामुळे क्रिकेटवर खर्च करणे कठीण झाले होते. अशा परिस्थितीत भारती रेल्वे, आयकर विभाग आणि पोस्ट खात्यात स्पोर्ट्स कोट्यातून नोकरी मिळते का, यासाठी शेकडो फॉर्म भरायची. अखेर 2023 मध्ये तिला बंगळुरूच्या आयकर विभागात क्लार्कची नोकरी मिळाली आणि तिची आर्थिक चिंता काहीशी मिटली.
( नक्की वाचा : IPL मधील मुस्लीम खेळाडूकडून हिंदू प्रेयसीचे 'ब्रेनवॉशिंग'? कुराणातील आयती पाठ करण्याचा दबाब! वाचा सविस्तरका झाली भारतीची निवड?
भारतीय महिला संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौर दुखापतग्रस्त झाल्यामुळे मधल्या फळीत एका आक्रमक फिनिशरची गरज होती. यासाठी निवड समितीने अनुभवी हरलीन देओल ऐवजी भारती फुलमाळीला पसंती दिली. 'वुमेन्स प्रीमियर लीग' (WPL) 2026 मध्ये गुजरात जाएंट्सकडून खेळताना भारतीने तिच्या फटकेबाजीने सर्वांना प्रभावित केले होते. तिची सध्याची फॉर्म आणि संघाचा समतोल लक्षात घेऊन मुख्य निवडकर्त्या अमिता शर्मा यांनी तिच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
जितेश शर्मासोबतचा सराव आणि प्रेरणा
भारती आणि भारताचा पुरुष क्रिकेटपटू जितेश शर्मा हे दोघेही अमरावतीचे आहेत. हे दोघे सुरुवातीच्या काळात अमरावतीच्या मैदानावर एकत्र सराव करायचे आणि नागपूरला प्रवासासाठीही सोबत जायचे. विशेष म्हणजे, जेव्हा जितेशची आयपीएलमध्ये निवड झाली होती, तेव्हा त्याने "मला भारतीसारखे मोठे सिक्सर्स मारायचे आहेत" असे म्हटले होते. जितेशचा क्रिकेटमधील प्रवास भारतीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे.
( नक्की वाचा : Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण? )
T20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय टीम
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 14 जून पासून इंग्लंडमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा उत्तम मेळ घालण्यात आला आहे.
T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट टीम
हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (व्हाईस कॅप्टन), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकिपर), भारती फुलमाळी, श्रीचरणी, यास्तिका भाटीया (विकेटकिपर), नंदिनी शर्मा, अरूंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौडा, श्रेयांका पाटील आणि
राधा यादव
Advertisement
राधा यादव