बुद्धिबळाच्या जगात भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने रचला इतिहास; गौतम अदाणींनीही दिल्या शुभेच्छा

प्रज्ञानंद याच्या विजयासाठी अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत प्रज्ञानंद याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

जाहिरात
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ टुर्नामेंटमध्ये जगभरातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याच्या विरोधात क्लासिक बुद्धिबळ लढतीत विजय मिळवल्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू फाबियानो कारूआना यालाही क्लासिकल बुद्धिबळाच्या पाचव्या टप्प्यात पराभूत केलं आहे. या विजयासह प्रज्ञानंद क्लासिक बुद्धिबळात जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन आणि दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू कारूआना याला पहिल्यांदा पराभूत करण्यात यश मिळवलं आहे.

भारतीय ग्रँडमास्टर आता आपल्या जबरदस्त सादरीकरणाच्या जोरावर आतंरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या जागतिक टॉप दहामध्ये सामील होईल. प्रज्ञानंद याच्या विजयासाठी अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत प्रज्ञानंद याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

गौतम अदाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, अविश्वसनीय प्रज्ञानंद, #NorwayChess मध्ये क्लासिकल बुद्धिबळात जगातील पहिल्या क्रमांकवर असलेला मॅग्नेस कार्लसन आणि दुसऱ्या क्रमांकावरील फॅबियानो कारूआना दोघांनाही पराभूत करणं अद्भूत आहे. तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी जबरदस्त कामगिरी करीत आहात. देशाचा तिरंगा मानाने असाच उंचावत राहा. खूप शुभेच्छा...

Advertisement

याशिवाय प्रज्ञानंदाच्या ऐतिहासिक विजयानंतर नॉर्वे चेसच्या अधिकृत अकाऊंटवरुनही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.