Paris Olympics 2024 : अभिनंदन भारत! हॉकी टीमनं पटकावले ब्रॉन्झ मेडल, स्पेनचा केला थरारक पराभव

Indian Men's Hockey Team Win Bronze Medal in Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पकमध्ये भारतानं ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
I
मुंबई:

Indian Men's Hockey Team Win Bronze Medal in Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पकमध्ये भारतानं ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे. ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या लढतीमध्ये भारतानं स्पेनचा 2-1 नं पराभव केला.भारतीय टीम सुरुवातील पिछाडीवर होती. पण, भारतानं त्यानंतर जोरदार कमबॅक करत 2 गोल केले आणि विजेतेपद पटकावले.

सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुुरुष हॉकी टीमनं ब्रॉन्झ मेडल मिळवलंय. यापूर्वी टोक्यो ऑलिम्पिकमध्येही भाारतानं ब्रॉन्झची कमाई केली होती. 

कसा झाला सामना?

भारत आणि स्पेन हाफ टाईमपर्यंत 1-1 नं बरोबरीत होते. मार्क मिरालेसनं गोल करत स्पेनला आघाडी मिळवून दिली होती. भारताकडून पहिला गोल हरमनप्रीत सिंहनं 30 व्या मिनिटाला केला. त्यानंतर हरमनप्रीतनंच 33 व्या मिनिटाला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली.

भारताच्या अनेक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा गोलकिपर पीआर श्रीजेशचा हा शेवटचा सामना होता. श्रीजेशनं या सामन्यातही चपळ गोलरक्षण केलं. त्यानं स्पेनचे अनेक हल्ले परतावून लावले. अगदी शेवटच्या क्षणी स्पेनचा प्रयत्न रोखत भारताच्या ब्रॉन्झ मेडलवर शिक्कामोर्तब केलं. 

Advertisement

भारताचं चौथं मेडल

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं हे चौथं मेडल आहे. यापूर्वी भारतानं शूटिंगमध्ये तीन ब्रॉन्झ मेडल मिळवली होती. भारतीय हॉकी टीमनं या स्पर्धत ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनला पराभूत केलं. सेमी फायनलमध्ये जर्मनीविरुद्ध पराभूत झाल्यानं भारताचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न हुकलं. भारतीय हॉकी टीमनं आजवर ऑलिम्पिकमध्ये 8 गोल्ड मेडल जिंकली आहेत. भारतानं 1980 साली मॉस्कोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये शेवटचं गोल्ड मेडल जिंकलं होतं.  

बातमी अपडेट होत आहे.