Pratika Rawal's Photos: व्हीलचेअरनंतर प्रतिकाचा स्टायलिश लूक! मेकओव्हरचे फोटो व्हायरल

विश्वचषकात तिने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. 434 धावा करणारी स्मृती मानधना आणि 328 धावा करणारी ॲश्ले गार्डनर यांच्या नंतर 308 धावांसह ती स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

ICC महिला विश्वचषक 2025 स्पर्धेत भारताच्या ऐतिहासिक कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी सलामीवीर प्रतिका रावल सध्या दुखापतीतून सावरत आहे. याही परिस्थितीत 24 वर्षीय प्रतिकाने सोशल मीडियावर स्टायलिश मेकओव्हरचे फोटो शेअर करून चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.

प्रतिकाने X आणि इन्स्टाग्राम या दोन्ही सोशल मीडिया अकाउंट्सवर हे फोटो शेअर केले आहेत. या नवीन फोटोंमध्ये ती शांत आणि कॉन्फिडन्ट दिसत आहे. चाहत्यांनीही तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. तसेच तिचं कौतुकही केलं. तिचा हा स्टायलिश मेकओव्हर तिच्या रिकव्हरीचे सकारात्मक संकेत असल्याचं म्हटलं जात आहे. लवकरच ती पूर्ण तंदुरुस्त होऊन संघात परतेल अशी आशा फॅन्सना आहे.

प्रतिकाची विश्वचषकातील कामगिरी

विश्वचषकात तिने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. 434 धावा करणारी स्मृती मानधना आणि 328 धावा करणारी ॲश्ले गार्डनर यांच्या नंतर 308 धावांसह ती स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होती.

Advertisement

बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना तिला घोटा आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. ती वेदनेत मैदानातून बाहेर गेली आणि तिला उर्वरित स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर विश्वचषक अंतिम सामन्यानंतर नवी मुंबईत झालेल्या सेलिब्रेशनच्या वेळी ती व्हीलचेअरवर दिसली.

प्रतिकाचं करिअर

प्रतिकाने 2022 मध्ये पदार्पण केल्यापासून केवळ 24 एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतक आणि सात अर्धशतकांसह तिने 1,100 हून अधिक धावा केल्या आहेत. तिची सरासरी 50.45 पेक्षा जास्त आहे.

Advertisement

Topics mentioned in this article