Neeraj Chopra Paris Olympics 2024 Javelin Throw : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भालाभेक करत फायनलमध्ये जागा मिळवली.
नीरजला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी 84 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त थ्रो करण्याची गरज होती. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात तो टप्पा सहज पार करत फायनलमध्ये प्रवेश केला. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरजकडून यंदाही गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. फायनलमध्ये 90 मीटरपेक्षा लांब भाला फेकण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
( नक्की वाचा : India vs Germany : भारत गोल्ड मेडलपासून फक्त 2 विजय दूर, कधी आणि कुठे पाहणार मॅच ? )
नीरज चोप्रा यंदाही गोल्ड मेडल जिंकण्यात यशस्वी ठरला तर सलग दोन ऑलिम्पकमध्ये गोल्ड पटकावणारा तो पाचवा भालाफेकपटू बनेल. यापूर्वी हा विक्रम एरिक लेमिंग (स्वीडन 1908 आणि 1912), जोन्नी माइरा (फिनलँड 1920 आणि 1924), नीरज चोप्राचा आदर्श जान जेलंजी (झेक गणराज्य 1992, 1996) आणि आंद्रियास टी (नार्वे 2004 आणि 2008 ) यांनी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहेत.
नीरजनं यापूर्वी स्टॉकहममध्ये झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत 89.94 मीटर थ्रो केला होता. ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. त्यानं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावताना 87.58 मीटर थ्रो केला होता. त्यानंतरच्या 15 स्पर्धांमध्ये नीरजनं फक्त 2 वेळा 85 मीटरपेक्षा कमी थ्रो केला आहे.