जाहिरात

India vs Germany : भारत गोल्ड मेडलपासून फक्त 2 विजय दूर, कधी आणि कुठे पाहणार मॅच ?

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीम  (Indian Hockey Team)  सोनेरी इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे.

India vs Germany :  भारत गोल्ड मेडलपासून फक्त 2 विजय दूर, कधी आणि कुठे पाहणार मॅच ?
India vs Germany Hockey match Paris 2024 Olympic (Photo : @AFP)
मुंबई:


Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीम  (Indian Hockey Team)  सोनेरी इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. हॉकी विश्वावर एकेकाळी भारताचं वर्चस्व होतं. 1980 साली मॉस्कोमध्ये भारतीय टीमनं ऑलिम्पिकमध्ये शेवटचं गोल्ड मेडल जिंकलं. त्यानंतर भारतीय टीमच्या कामगिरीला उतरती कळा लागली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकत भारतानं मोठं यश मिळवलं. आता पॅरिसमध्येही भारतीय संघ दमदार खेळत आहे.

भारतानं क्वार्टर फायनलमध्ये झालेल्या रोमहर्षक लढतीत ब्रिटनचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. या विजयानंतर यंदा मेडलचा कलर बदलेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर यंदा भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळेल अशीच सर्वांना अपेक्षा आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारत वि. जर्मनी लढतीचा रेकॉर्ड (India vs Germany hockey head to head) 

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी झालेल्या लढतीमध्ये भारतानं जर्मनीचा 5-4 असा पराभव केला होता. त्यानंतर दोन्ही टीमनं आत्तापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 सामने भारतानं जिंकले असून जर्मनीनं फक्त यावर्षी जूनमध्ये झालेला सामना जिंकला आहे.

टोक्योमध्ये 41 वर्षांनी मेडल जिंकणाऱ्या भारतीय हॉकी टीमनं ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत 8 गोल्ड मेडल जिंकली आहेत. तर जर्मनीच्या पुरुष हॉकी टीमला 3 गोल्ड मेडल मिळाली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि जर्मनीमध्ये आत्तापर्यंत 8 सामने झाले आहेत. भारतानं यापैकी 3 सामने जिंकले आहेत. तर जर्मनीलाही 3 सामन्यात विजय मिळला आहे. तर 2 सामने ड्रॉ झाले आहेत. 

कधी आणि कुठं पाहता येणार मॅच?

भारत विरुद्ध जर्मनी यांच्यातील सेमी फायनल मॅच आज 6 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10.30 वाजता पाहता येईल. हॉकी मॅच स्पोर्ट्स 18 वर तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर त्याचं लाईव्ह ऑन लाईन स्ट्रिमिंग JioCinema अ‍ॅपवरही पाहता येईल. 

( नक्की वाचा : Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक मेडल, कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते मनूनं केलं )
 

गोल्ड मेडलपासून दोन विजय दूर

भारतीय हॉकी टीमला यंदा इतिहास रचण्याची संधी आहे. ऑलिम्पिकची सेमी फायनल गाठणाऱ्या या टीमपासून गोल्ड मेडल फक्त 2 विजय दूर आहे. त्यापैकी एक लढत जर्मनीविरुद्ध सेमी फायनलमध्ये होणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com