IPL 2024: आयपीएल फायनलवर वादळाचं सावट, मॅच रद्द झाली तर कुणाला मिळणार ट्रॉफी?

KKR vs SRH IPL 2024 Final : रविवारी होणाऱ्या आयपीएल फायनलपूर्वी क्रिकेट फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
KKR vs SRH : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये आयपीएल 2024 ची फायनल होणार आहे. (फोटो BCCI)
मुंबई:

KKR vs SRH, Rain To Play Spoilsport In IPL Final? :  गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या आयपीएल 2024 ची फायनल आता काही तासांवर आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन टीममध्ये फायनल खेळली जाणार आहे. चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमवर रविवारी (26 मे) संध्याकाळी 7.30 वाजता या टीम एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरतील. या फायनलपूर्वी क्रिकेट फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

चेन्नईत रविवारी खेळल्या जाणाऱ्या आयपीएल फायनलवर 'रेमल' वादळाचं सावट आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगलाच्या उपसागरावर निर्माण झालेल्या दबावामुळे चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली. सध्या हे वादळ चेन्नईच्या पूर्वेला 1500 किलो मीटर अंतरावर स्थिर आहे. पण, या कारणामुळे चेन्नईच्या तापमानामध्ये फरक पडू शकतो. 

हवामान विभागांच्या अंदाजानुसार चेन्नईत मॅच दरम्यान ढगांचं सावट असेल. फायनल मॅचमध्ये पावसामुळे खेळात अडथळा आला तर बीसीसीआयनं त्यासाठी एक अतिरिक्त दिवस ठेवला आहे. रिझर्व्ह डे ला देखील पाऊस झाला तर अंतिम सामना रद्द घोषित केला जाईल. त्यापरिस्थितीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेता घोषित करण्यात येईल. आयपीएलच्या साखळी फेरीत केकेआरनं सनरायझर्स हैदराबादपेक्षा चांगली कामगिरी केल्यानं केकेआरला हा फायदा मिळणार आहे.

( नक्की वाचा : 5 कारणांमुळे गौतम गंभीर होऊ शकतो टीम इंडियाचा कोच )
 

कोलकाता नाईट रायडर्सनं साखळी फेरीतील 14 सामन्यात 9 विजयासंह 20 पॉईंट्सची कमाई केली. तर सनरायझर्स हैदराबादनं 8 विजयासह 17 पॉईंट्स मिळवले होते. या दोन्ही टीम पहिल्या क्वालिफायरमधील लढत केकेआरनं सहज जिंकली होती. अहमदाबादमध्ये झालेल्या त्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादनं दिलेलं 160 रन्सचं आव्हान केकेआरनं 38 बॉल आणि 8 विकेट्स राखून पूर्ण केलं.

Advertisement

रमेल चक्रीवादळ 26 मे रोजी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला धडकेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. या रिपोर्टनुसार तामिळनाडू आणि अन्य भागावर या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.