'तो कॅप्टन आहे, कुणी... KL राहुलच्या बचावासाठी पुढं आला शमी, लखनौच्या मालकांना सुनावलं

Mohammed Shami came out in support of KL Rahul: टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी त्याचा सहकारी केएल राहुलचा बचाव करण्यासाठी पुढं आला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
KL राहुलच्या बचावासाठी पुढं आलेला शमी हा पहिला भारतीय क्रिकेटर आहे.
मुंबई:

Mohammed Shami came out in support of KL Rahul: टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी त्याचा सहकारी केएल राहुलचा बचाव करण्यासाठी पुढं आला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये रा्हुल कॅप्टन असलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा 10 विकेट्सनं मोठा पराभव झाला. या पराभवानंतर लखनौचे मालक संजीव गोयंका भर मैदानात राहुलवर संतापले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर शमीनं राहुलची बाजू घेत गोयंकाला सुनावलंय. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देणारा शमी हा पहिला भारतीय क्रिकेटर आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शमीनं 'क्रिकबझ लाईव्ह' वर बोलताना या विषयावर प्रतिक्रिया दिलीय. 'लाखो-करोडो लोक तुम्हाला पाहातात. तुमच्याकडून शिकतात. तुम्ही कॅमेऱ्यासमोर या गोष्टी करत असाल तर ते लज्जास्पद आहे. तुमची बोलण्याची एक पद्धत असयाला हवी. या प्रकारातून चुकीचा संदेश जातो. खेळाडूंची देखील प्रतिष्ठा आहे. टीमचे मालक म्हणून तुमची देखील ओळख आहे. या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला शोभत नाहीत.

( नक्की वाचा : आधी धोनीला कॅप्टनपदावरुन काढलं आता राहुलवर भडकले! कोण आहेत LSG चे मालक संजीव गोयंका? )

शमी पुढं म्हणाला,' तो कॅप्टन आहे. कुणी सामान्य खेळाडू नाही. हा टीम गेम आहे. एखादी योजना यशस्वी झाली नाही तर फार मोठी बाब नाही. खेळात काहीही होऊ शकतं. चांगले किंवा वाईट दिवस असू शकतात, हे मला माहिती आहे. प्रत्येक खेळाडूची प्रतिष्ठा आहे. बोलण्याची पद्धत आहे. तुम्हाला राग व्यक्त करायचा असेल तर त्याचा वेगळा मार्ग आहे.'

आयपीएल 2024 मधील बुधवारी (8 मे) झालेल्या सामन्यात  लखनौ सुपर जायंट्सनं (LSG) दिलेलं 167 रनचं लक्ष्य सनरायझर्सनं फक्त 9.4 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. या मॅचनंतर जे दिसलं त्याची कुणीही कल्पना केली नसेल. लखनौ सुपर जायटंसचे मालक संजीव गोयंका हे भर मैदानात केएल राहुलवर चिडलेले दिसले. त्यांनी लखनौच्या लाजीरवाण्या पराभवाचा संताप राहुलवर काढला. 

Advertisement
Topics mentioned in this article