आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ची कामगिरी निराशाजनक झालीय. पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या या टीमनं पहिल्या 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. सीएसके सध्या पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. पहिल्या 6 ओव्हरच्या पॉवर प्लेचा फायदा घेत हमखास सिक्स मारणाऱ्या खेळाडूची कमतरता सीएसकेला जाणवतीय. सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) ही डोकेदुखी आता संपणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आक्रमक प्लेयरची एन्ट्री
सीएसकेच्या टीममध्ये दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक बॅटर आणि मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू डेवाल्ड ब्रेविसची (Dewald Brevis) एन्ट्री झाली आहे. सीएसकेनं जखमी गुरजपनीत सिंहच्या जागी ब्रेविसचा समावेश केलाय.
2022 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये ब्रेविस पहिल्यांदा चर्चेत आला होता. त्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं सर्वात जास्त रन केले होते. ब्रेविसची बॅटिंग पाहून त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डीव्हिलियर्सची केली जाते. 'बेबी एबी' या नावानं तो क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे.