जाहिरात

IPL 2025 : वय वर्ष 17! एकाच मॅचमध्ये मारले होते 11 सिक्स! CSK चा नवा मुंबईकर उडवणार सर्वाची झोप

Who is Ayush Mhatre? : आयुष म्हात्रे सीएसकेमध्ये नवा चेहरा असला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचं नाव नवं नाही.

IPL 2025 : वय वर्ष 17! एकाच मॅचमध्ये मारले होते 11 सिक्स! CSK चा नवा मुंबईकर उडवणार सर्वाची झोप
सीएसकेनं त्याच्या जागी 17 वर्षांच्या मुंबईकरचा टीममध्ये समावेश केला आहे. (फोटो - BCCI)
मुंबई:

Who is Ayush Mhatre? :  आयपीएल 2025 मधील पहिल्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाच वेळा विजेतेपद मिळणाऱ्या सीएसकेनं 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. त्यातच सीएसकेचा नियमित कॅप्टन ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडलाय. सीएसकेनं त्याच्या जागी 17 वर्षांचा मुंबईकर आयुष म्हात्रेचा टीममध्ये समावेश केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

17 व्या वर्षीच रचलाय विक्रम

आयुष म्हात्रे सीएसकेमध्ये नवा चेहरा असला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचं नाव नवं नाही. लिस्ट A प्रकारातील एकाच इनिंगमध्ये 150 पेक्षा जास्त रन करण्याचा विक्रम आयुषच्या नावावर आहे. त्यानं 31 डिसेंबर 2024 रोजी मुंबई विरुद्ध नागालँड सामन्यात हा विक्रम केला होता.

आयुषनं त्या सामन्यात  फक्त 117 बॉलमध्ये 181 रनची वादळी खेळी केली. यावेळी त्यानं मुंबईकर यशस्वी जैस्वालचा रेकॉर्ड मोडला. 17 वर्ष 168 दिवस वय असलेला आयुष लिस्ट ए क्रिकेटमधील एका इनिंगमध्ये 150 रनचा टप्पा ओलांडणारा सर्वात कमी वयाचा भारतीय बनला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड मुंबईच्याच यशस्वी जैस्वालच्या नावावर होता. यशस्वीनं 2019 साली झारखंड विरुद्ध 17 वर्ष 291 दिवस वय असताना हा विक्रम केला होता. 

( नक्की वाचा : Vinod Kambli : विनोद कांबळीला मिळणार दरमहा 30,000 रुपये, महान क्रिकेटपटूनं दिला मदतीचा हात )
 

आयुषनं सीएसकेची टॅलेंट टीम आणि महेंद्रसिंह धोनीला प्रभावित केलं होतं. आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी त्याला ट्रायलसाठीही बोलवण्यात आलं होतं. पण, मेगा ऑक्शनमध्ये तो अनसोल्ड ठरला होता. त्यानंतर सीएसकेनं ऋतुराज जखमी झाल्यानंतर आयुषचा टीममध्ये समावेश केला आहे.

आयुषचा रेकॉर्ड

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळत असलेल्या आयुषचा रोहित शर्मा हा आदर्श आहे. त्यानं आत्तापर्यंत 9 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 31.50 च्या सरासरीनं 504 रन केले आहेत. त्यामध्ये 2 हाफ सेंच्युरी आणि 1 सेंच्युरीचा समावेश आहे. 176 हा त्याचा या प्रकारातील सर्वोच्च स्कोअर आहे.

तर 7 लिस्ट A सामन्यात त्यानं 65.42 च्या सरासरीनं 458 रन काढले आहेत. यामध्ये 2 सेंच्युरी आणि 1 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. 

आक्रमक बॅटर्सचा अभाव हे सीएसकेच्या या सिझनमधील खराब कामगिरीचं एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आयुषची निवड महत्त्वाची मानली जात आहे. त्याचबरोबर तो सध्या फक्त 17 वर्षांचा असल्यानं भविष्यकाळासाठी देखील तो सीएसकेचा महत्त्वाचा खेळाडू ठरु शकतो.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: