IPL 2025 : कॅप्टन बदलला पण निकाल नाही, CSK वर 18 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ओढावली लाजीरवाणी वेळ

IPL 2025, CSK vs KKR : सीएसकेचा कॅप्टन बदलला पण निकाल काही बदलला नाही. सीएसकेचा या सिझनमधील हा सलग पाचवा पराभव आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

IPL 2025, CSK vs KKR : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) फ्लॉप शो सुरु आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) झालेल्या सामन्यात सीएसकेचा 8 विकेट्स आणि 59 बॉल राखून पराभव झाला.  सीएसकेचा नियमित कॅप्टन ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेलाय. त्यामुळे आता टीमला पाचवेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंह धोनी कॅप्टन झाला आहे. 

सीएसकेचा कॅप्टन बदलला पण निकाल काही बदलला नाही. सीएसकेचा या सिझनमधील हा सलग पाचवा पराभव आहे. आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात सीएसकेनं पहिल्यांदाच सलग पाच सामने गमावले आहेत. या पराभवामुळे या सिझनची प्ले ऑफ गाठण्याचा सीएसकेचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सीएसकेनं दिलेलं 104 रनचं आव्हान केकेआरनं फक्त  ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. केकेआरनं सुनील नरीननं 18 बॉलमध्ये 44 रन काढले. या खेळीत नरीननं पाच सिक्स लगावत केकेआरचा विजय जवळ आणला. 

सीएसकेचा फ्लॉप शो

या मॅचमध्ये टॉसपासूनच सर्व गोष्टी सीएसकेच्या विरुद्ध घडत गेल्या. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या सीएसकेनं पहिल्या सहा ओव्हरमध्येच डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रविंद्र हे ओपनर गमावले. त्यानंतर विजय शंकर आणि राहुल त्रिपाठी यांनी तिसऱ्या विकेटसाठी 43 रनची पार्टनरशिप केली. 

Advertisement

विजय शंकर 29 रनवर आऊट झाल्यानंतर सीएसकेची घसरगुंडी उडाली. राहुल त्रिपाठी, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, दीपक हुडा आणि महेंद्रसिंह धोनी झटपट आऊट झाल्यानं सीएसकेची अवस्था 8 आऊट 75 अशी झाली होती. 

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025, RCB vs DC : KL राहुलची 'कमाल लाजवाब' खेळी रंगतदार लढतील दिल्लीचा RCB वर विजय )

शिवम दुबेनं शेवटी फटकेबाजी करत सीएसकेला शंभरीचा टप्पा ओलांडून दिला. सीएसकेनं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 103 रन केले. आयपीएलच्या आजवरच्या इतिहास चेन्नईतील चेपॉक मैदानात सीएसकेचा हा सर्वात कमी स्कोअर आहे. 

केकेआरकडून सुनील नरीनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी 2 विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. 

Advertisement
Topics mentioned in this article