जाहिरात

IPL 2025, RCB vs DC : KL राहुलची 'कमाल लाजवाब' खेळी रंगतदार लढतील दिल्लीचा RCB वर विजय

IPL 2025, RCB vs DC : आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 आऊट 163 रन केले होते.

IPL 2025, RCB vs DC : KL राहुलची 'कमाल लाजवाब' खेळी रंगतदार लढतील दिल्लीचा RCB वर विजय
मुंबई:

आयपीएल 2025 मध्ये आज (10 एप्रिल 2025) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मॅच झाली. या सिझनमध्ये फॉर्मात असलेल्या दोन्ही टीममधील ही मॅच चांगलीच रंगतदार झाली. त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सनं आरसीबीचा 6 विकेट्सनं पराभव केला. दिल्लीचा या सिझनमधील चौथा विजय आहे. दिल्ली कॅपिटल्स या सिझनमध्ये एकही सामना न गमावलेली टीम आहे. अनुभवी केएल राहुल हा दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर दिल्लीनं हा विजय मिळवला. राहुलनं 53 बॉलमध्ये नाबाद 93 रन काढले. या खेळीत त्यानं 7 फोर आणि 6 सिक्स लगावले. 

आरसीबीनं दिलेल्या 164 रन्सचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. दिल्लीनं पहिल्या 6 ओव्हर्समध्येच तीन विकेट्स गमावल्या. केएल राहुल (KL Rahul) आणि अक्षर पटेलनं (Axar Patel) ही पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. पण सूयश शर्मानं अक्षरला (15) आऊट करत दिल्लीला मोठा धक्का दिला. 

दिल्लीची पडझड सुरु असताना अनुभवी केएल राहुलनं एक बाजू लावून धरली होती. राहुलनं या सिझनमधील दुसरी हाफ सेंच्युरी 37 बॉलमध्ये पूर्ण केली. राहुलनं फटकेबाजी करत दिल्लीवरचा दबाव कमी केला. 

दिल्लीच्या इनिंगमधील 15 वी ओव्हर जोश हेजलवुडनं टाकली. या ओव्हरमध्ये राहुलनं 22 रन काढले. त्या ओव्हरमधील 3 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं राहुलनं 22 रन टोलावले. 

त्यापूर्वी आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 आऊट 163 रन केले होते. फिल सॉल्ट आणि विराट कोहली जोडीनं आरसीबीची सुरुवात धडाक्यात केली होती. या दोघांनी मिचेल स्टार्कच्या एकाच ओव्हरमध्ये 30 रन काढले. आरसीबीनं 3 ओव्हरमध्येच पन्नाशीचा टप्पा ओलांडला होता.

IPL 2025 : 6,4,4,5, 6...मिचेल स्टार्कची इतकी धुलाई कधीच पाहिली नसेल, एका ओव्हरमध्ये काढले 30 रन्स

( नक्की वाचा :  IPL 2025 : 6,4,4,5, 6...मिचेल स्टार्कची इतकी धुलाई कधीच पाहिली नसेल, एका ओव्हरमध्ये काढले 30 रन्स )

फिल सॉल्ट 37 रन काढून दुर्दैवी आऊट झाला आणि आरसीबीची इनिंग घसरली. आरसीबीची अवस्था 7 आऊट 125 झाली होती. त्यानंतर टीम डेव्हिडनं फटकेबाजी करत आरसीबीला 163 चा टप्पा गाठून दिला. डेव्हिडनं 20 बॉलमध्ये नाबाद 37 रन काढले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: