IPL 2025 : एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या बॉलरला CSK कधी घेणार? बेंचवर बसलाय यॉर्कर किंग

IPL 2025 CSK : देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो 'यॉर्कर किंग' म्हणून ओळखला जातो. एका इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड देखील त्याच्या नावावर आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पाच वेळा आयपीएल विजेचेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची या सिझनमधील कामगिरी निराशानजनक होत आहे. ऋतुराज गायकवाडच्या टीमनं पाच पैकी चार सामने गमावले आहेत. त्यांचा सध्याचा खेळ पाहाता ही टीम 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्याची शक्यता कमी आहे. सीएसकेच्या विरुद्ध सर्वच टीम्स रन्सची लयलूट करत आहेत. त्यांचे प्रमुख बॉलर्स अपयशी ठरत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पंजाब किंग्जनं सीएसकेविरुद्ध निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 219 रन्स केले. त्यांचा प्रमुख बॉलर पथिराणा चांगलाच महागडा ठरला. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 52 रन्स दिले. तर अश्विनच्या 4 ओव्हर्समध्ये 48 रन्स निघाले. खलिल अहमदनंही 4 ओव्हर्समध्ये 45 रन मोजले. 

सीएसकेच्या टीममध्ये अन्य काही फास्ट बॉलर्स बेंचवर आहेत. त्यापैकी नॅथन एलिस आणि जेमी ओव्हरटन प्रत्येकी एक-एक मॅच खेळली आहे. तर कमलेश नागरकोटी आणि अंशुल कंबोज यांना अद्याप एकदाही संधी मिळालेली नाही. 

अंशुल कंबोजला सीएसके कधी संधी देणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. कारण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो 'यॉर्कर किंग' म्हणून ओळखला जातो. एका इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड देखील त्याच्या नावावर आहे.

Advertisement

( नक्की वाचा :  IPL 2025 : 'फक्त या गोष्टीचा फरक आहे' CSK च्या सलग 4 पराभवाचं कॅप्टन ऋतुराजनं सांगितलं कारण )

3.4 कोटींना केलं खरेदी

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये अंशुल कंबोजची बेस प्राईज 20 लाख होती. त्याला सीएसकेनं तब्बल 3.4 कोटींना खरेदी केलं. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना मागे टाकून सीएसकेनं त्याला खरेदी केलं. अंशुल मागील सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचा सदस्य होता. त्याला मुंबईनं रिटेन केले नव्हते. 

Advertisement

एका इनिंगमध्ये 10 विकेट्स

अंशुल कंबोजची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी दमदार आहे. त्यानं मागील रणजी सिझनमध्ये एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. अंशुलनं हरियणाकडून खेळताना केरळ विरुद्ध हा पराक्रम केला होता. 

Advertisement

( नक्की वाचा :  IPL 2025 : ठाकूर तुला मानलं रे... 5 वाईड बॉल ठरले मॅचचा टर्निंग पॉईंट, 'लॉर्ड'चं भन्नाट डोकं समजलं का? )

त्यानं आत्तापर्यंत 22 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 74 विकेट्स घेतल्या आहेत. 25 लिस्ट A मंॅचमध्ये 40 तर 22 T20 मध्ये 26 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. उजव्या हातानं फास्ट बॉलिंग करणारा उंचपुरा अंशुल बॉल स्विंग करण्यास कुशल मानला जातो. फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर त्याची बॉलिंग उपयुक्त मानली जाते. प्रमुख बॉलर निराशा करत असताना सीएसके मॅनेजमेंट तरुण अंशुलला कधी संधी देणार हा खरा प्रश्न आहे. 

Topics mentioned in this article