जाहिरात

IPL 2025 : 'फक्त या गोष्टीचा फरक आहे' CSK च्या सलग 4 पराभवाचं कॅप्टन ऋतुराजनं सांगितलं कारण

IPL 2025 : 'फक्त या गोष्टीचा फरक आहे' CSK च्या सलग 4 पराभवाचं कॅप्टन ऋतुराजनं सांगितलं कारण
मुंबई:

IPL 2025, PBKS vs CSK : पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) या सिझनमधील कामगिरी निराशाजनक झाली आहे. सीएसकेनं मुंबई इंडियन्सचा पराभव करत या सिझनची सुरुवात चांगली केली होती. पण, त्यानंतर त्यांना सलग चार सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे. मंगळवारी (8 एप्रिल) रोजी झालेल्या सामन्यात सीएसकेचा 18 रननं पराभव झाला. या पराभवानंतर सीएसकेचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं आहे. पंजाब विरुद्धच्या पराभवानंतर सीएसकेच्या खराब कामगिरीचं कारण कॅप्टन ऋतुराज गायकवाड यांनी सांगितलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

का होतोय CSK चा पराभव?

सीएसकेच्या सलग चार पराभवाचं कारण खराब फिल्डिंग आहे, असं कॅप्टन ऋतुराजनं सांगितलं. पंजाब विरुद्धच्या पराभवानंतर बोलताना तो म्हणाला की, 'माझ्या मते गेल्या चार मॅचध्ये ज्या खेळाडूंचा कॅच सोडला त्यांनी अतिरिक्त 15, 20, 30 रन काढले. हे अंतर गेल्या चार मॅचमध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरलं.' 

Priyansh Arya : फक्त 39 बॉलमध्ये CSK विरुद्ध सेंच्युरी, एका ओव्हरमध्ये मारले आहेत 6 सिक्स !

( नक्की वाचा : Priyansh Arya : फक्त 39 बॉलमध्ये CSK विरुद्ध सेंच्युरी, एका ओव्हरमध्ये मारले आहेत 6 सिक्स ! )

ऋतुराजनं यावेळी प्रियांश आर्याचंही कौतुक केलं. पंजाब किंग्जच्या प्रियांशनं सीएसके विरुद्ध 39 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. त्यावर ऋतुराज म्हणाला, 'ती अतिशय साहसी खेळी केली होती. त्यानं दमदार कामगिरी केली. आम्ही नियमित अंतरानं विकेट घेत होतो. जर 10-15 रन्स कमी झाले असते तर आमचा फायदा झाला असता. पण, कॅच सोडल्यामुळे तसं झालं नाही.'

IPL 2025 : ठाकूर तुला मानलं रे... 5 वाईड बॉल ठरले मॅचचा टर्निंग पॉईंट, 'लॉर्ड'चं भन्नाट डोकं समजलं का?

( नक्की वाचा :  IPL 2025 : ठाकूर तुला मानलं रे... 5 वाईड बॉल ठरले मॅचचा टर्निंग पॉईंट, 'लॉर्ड'चं भन्नाट डोकं समजलं का? )

आपल्या टीमच्या बॅटिंगबद्दल बोलताना ऋतुराज म्हणाला की, 'फास्ट बॉलिंगवर चांगले खेळणारे आमचे दोन सर्वोत्तम बॅटर राचिन आणि कॉन्वे यांनी चांगली बॅटिंग केली. त्या दोघांनी पॉवर प्लेचा फायदा उठवला. बॅटिंगमध्ये आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. आम्ही विजयापासून फक्त दोन-तीन शॉट्स दूर होतो. '

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: