IPL 2025 : MS धोनीनं काढला हुकमी पत्ता, एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सची CSK मध्ये एन्ट्री

IPL 2025, CSK vs KKR : महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होताच सीएसकेच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

IPL 2025, CSK vs KKR : आयपीएल 2025 ची अडखळती सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची लढत कोलकाता नाईट रायडर्सची (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders)  होत आहे.  सीएसकेने या सिझनमध्ये आत्तपर्यंत पाचपैकी चार सामने गमावले आहेत. पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या 'प्ले ऑफ' ची वाटचाल खडतर आहे. त्यातच त्यांचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेलाय. महेंद्रसिंह धोनी आता टीमचं नेतृत्त्व करणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

धोनीनं काढला हुकमी पत्ता

महेंद्रसिंह धोनी कॅप्टन होताच सीएसकेच्या टीममध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. दुखापतीमध्ये स्पर्धेतून आऊट झालेल्या ऋतुराजच्या जागी राहुल त्रिपाठीनं टीममध्ये पुनरागमन केलंय. तर मुकेश चौधरीच्या जागी अंशुल कंबोजचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. गेल्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अंशुलचा सीएसकेकडून हा पहिलाच सामना आहे. गेली वर्षभर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या अंशुलला सीएसके कधी संधी देणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

( नक्की वाचा : IPL 2025 : 6,4,4,5, 6...मिचेल स्टार्कची इतकी धुलाई कधीच पाहिली नसेल, एका ओव्हरमध्ये काढले 30 रन्स )

एका इनिंगमध्ये 10 विकेट्स

अंशुल कंबोजची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी दमदार आहे. त्यानं मागील रणजी सिझनमध्ये एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. अंशुलनं हरियणाकडून खेळताना केरळ विरुद्ध हा पराक्रम केला होता. 

Advertisement

त्यानं आत्तापर्यंत 22 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 74 विकेट्स घेतल्या आहेत. 25 लिस्ट A मंॅचमध्ये 40 तर 22 T20 मध्ये 26 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. उजव्या हातानं फास्ट बॉलिंग करणारा उंचपुरा अंशुल बॉल स्विंग करण्यास कुशल मानला जातो. फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर त्याची बॉलिंग उपयुक्त मानली जाते. 

लिलावात मोठी चुरस

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये अंशुल कंबोजची बेस प्राईज 20 लाख होती. त्याला सीएसकेनं तब्बल 3.4 कोटींना खरेदी केलं. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना मागे टाकून सीएसकेनं त्याला खरेदी केलं. आता सीएसकेसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. या कसोटीच्या काळात अंशुलनं सीएसकेकडून पदार्पण केलं आहे. तो कशी कामगिरी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

Advertisement
Topics mentioned in this article