
IPL 2025, RCB vs DC : आयपीएल 2025 मध्ये आज (10 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals) हा सामना आहे. या सिझनमध्ये फॉर्मात असलेल्या आरसीबीनं या मॅचची सुरुवात धडाक्यात केली.
आरसीबीचा ओपनर फिल सॉल्टनं दिल्ली कॅपिटल्सच्या मिचेल स्टार्कची जबरदस्त धुलाई केली. दोन वन-डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमचा स्टार्क सदस्य आहे. या दोन्ही विजेतेपदामध्ये स्टार्कचं योगदान मोठं आहे. तसंच तो टेस्ट क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा बॉलर आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्टार्कनं या सिझनची सुरुवात देखील जबरदस्त केली आहे. त्यानं सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्या. आरसीबीच्या फिल सॉल्टवर स्टार्कच्या या कोणत्याही रेकॉर्डचा परिणाम झाला नाही.
एका ओव्हरमध्ये काढले 30 रन
फिल सॉल्टनं तिसरी ओव्हर टाकायला आलेल्या मिचेल स्टार्कचं स्वागत सिक्सनं लगावत केलं. त्यानंतरच्या पुढच्या दोन बॉलवर सॉल्टनं सलग दोन फोर मारले. तीन बॉलवर 14 रन दिल्यानंतर स्टार्कवर दबाव वाढला होता.
तिसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल स्टार्कनं नो बॉल टाकला. सॉल्टनं त्या बॉलवर देखील फोर लगावला. सॉल्ट एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं पुढच्या बॉलवर आणखी एक सिक्स लगावला. स्टार्कच्या या ओव्हरमधील चार बॉलमध्ये 25 रन निघाले होते.
( नक्की वाचा : IPL 2025 : 2023 पासून सीएसकेच्या बँचवर आहे वर्ल्ड चॅम्पियन, कॅप्टन ऋतुराजची जागा घेणार? )
स्टार्कच्या पाचव्या बॉलवर आरसीबीला लेगबायचा एक रन मिळाला. त्यानंतर विराट कोहली स्ट्राईकवर आला. शेवटच्या बॉलवर देखील आरसीबीनं लेगबायवर चार रन काढले. या पद्धतीनं फिल सॉल्ट आणि विराट कोहली या जोडीनं मिचेल स्टार्कच्या एका ओव्हरमध्ये 30 रन काढले.
आरसीबीनं फक्त 3 ओव्हरमध्ये पन्नाशीचा टप्पा ओलांडला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world