GT vs MI : शुबमन गिल आणि हार्दिक पांड्यातील वाद उघड, मैदानातील 2 घटनांमुळे खळबळ!

Hardik Pandya Rivalry With Shubman Gill: शुबमन गिल आणि हार्दिक पांड्याच्या टीममधील मॅचमध्ये एका गोष्टीची मोठी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टनमधील मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं दिसत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
GT vs MI : शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांच्यातील 2 घटनांची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
मुंबई:

Hardik Pandya Rivalry With Shubman Gill: हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल हे एकेकाळी एकाच आयपीएल टीमकडून खेळत होते. गुजरात टायटन्स (Gujrat Titans ) 2022 साली आयपीएल विजेतेपद मिळवलं होतं. या विजेतेपदात या दोघांचं मोठं योगदान होतं. त्यानंतर हार्दिक गुजरातची टीम सोडून मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) दाखल झाला. तर गिल अजूनही गुजरात टायटन्सकडं आहे. त्याला गुजरातनं कॅप्टन केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मागील आयपीएलमध्ये गुजरातची कामगिरी खास नव्हती. यंदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. पण, त्यांना यंदा मुंबई इंडियन्सचा अडथळा पार करता आला नाही. शुबमन गिल आणि हार्दिक पांड्याच्या टीममधील मॅचमध्ये एका गोष्टीची मोठी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टनमधील मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं दिसत आहे. 

( नक्की वाचा : IPL 2025, GT vs MI : गुजरातच्या 'साई-सुंदर' वर मुंबईच्या 'सुबरी'चा विजय! विजेतेपदाची आशा कायम )
 

या मॅचच्या सुरुवातीला टॉस झाल्यानंतर हार्दिकनं गिलच्या दिशेनं हात पुढे केला होता. पण, गिलने त्यावेळी हात मागे घेतले. त्यानंतर गुजरातच्या इनिंगमध्ये गिल झटपट आऊट झाला. त्यावेळी हार्दिकनं ज्या पद्धतीनं जल्लोष केला ते पाहता दोन्ही खेळाडूंंमध्ये आता पूर्वीसारखे संबंध नाहीत अशी चर्चा सुरु झाली आहे.

या मॅचमध्ये हार्दिकनं पाचव्या क्रमांकावर बॅटिंग करत फक्त 9 बॉलमध्ये 244.44 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 22 रन्स काढले. त्यानं यावेळी 3 सिक्स लगावले. जे मुंबई इंडियन्सनं मिळवलेल्या 20 रन्सच्या विजयात महत्त्वाचे ठरले. 

Advertisement

तर टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा नुकताच कॅप्टन झालेल्या शुबमन गिलनं साफ निराशा केली. तो अवघ्या 2 बॉलमध्ये 1 रन काढून आऊट झाला. ट्रेंट बोल्टनं त्याला आऊट केले. गुजरातवरील विजयानंतर मुंबई इंडियन्सची पुढील लढत रविवारी (1 जून 2025) पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध होणार आहे. 
 

Topics mentioned in this article