
IPL 2025, GT vs MI : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स (Mumbai Indians vs Gujarat Titans ) यांच्यात झालेल्या एलिमेनेटर सामना झाला. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सचा 20 रन्सनं पराभव केला. या विजयासह हार्दिक पांड्याच्या टीमनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केलाय. आता त्यांची लढत पंजाब किंग्जशी होणार आहे.
मुंबई इंडियन्सनं या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत गुजरातसमोर विजयासाठी 229 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. कॅप्टन शुबमन गिल (Shubman Gill) फक्त 1 रन्स काढून आऊट झाला. या सिझनमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या कुशल मेंडिसनं चांगली सुरुवात केली. पण, तो 10 बॉलमध्ये 20 रन्स काढून दुर्दैवानं हिट विकेट ठरला.
कुशल मेंडिस आऊट झाल्यानंतर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी जमली. या आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक रन्स काढणाऱ्या साईने आणखी एक जबाबदारीपूर्ण इनिंग खेळली. त्यानं 28 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली. सुदर्शनचा हा फॉर्म आगमी इंग्लंड सीरिजमध्ये टीम इंडियासाठी फायदेशीर ठरणार आहे.
वॉशिंग्टन सुंदरनं काही चांगले फटके लगावत जोरदार प्रतिकार केला. त्यानं 23 बॉलमध्ये 48 रन्स काढले. तर साई सुदर्शनला 80 रन्सवर आऊट करत गुजरातला मोठा धक्का दिला.
रोहितची दमदार खेळी
त्यापूर्वी मंुंबई इंडियन्सनं रोहित शर्माच्या (Rohit Sharma) दमदार हाफ सेंच्युरीच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 228 रन्स केले. रोहितनं 50 बॉलमध्ये 81 रन्स केले. या खेळीत रोहितनं 9 फोर आणि 4 सिक्स लगावले. रोहितनं यावेळी आयपीएलमध्ये 7000 रन्स आणि 300 सिक्स हे दोन महत्त्वाचे टप्पे पूर्ण केले. आयपीएल इतिहासात हे दोन्ही टप्पे ओलांडणारा तो दुसराच बॅटर आहे.
( नक्की वाचा : IPL 2025, MI vs GT : रोहित शर्माकडून रेकॉर्ड्सचा पाऊस, दमदार खेळीसह केले नवे पराक्रम )
मुंबई इंडियन्सकडून पहिल्यांदाच बॅटींग करणाऱ्या जॉनी बेअरस्टोनं 22 बॉल्समध्ये 47 रन्सची खेळी केली. तर हार्दिक पांड्यानं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत 9 बॉल्समध्ये नाबाद 22 रन्स केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world