IPL 2025 : KKR मॅनेजमेंटची मोठी चूक, शाहरुख खानला लागला 12 कोटींचा चुना, तुमच्या लक्षात आलं का?

IPL 2025 KKR : केकेआरनं मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची  यादी जाहीर झाल्यानंतर एक मोठी चूक उघड झाली आहे. त्याचा थेट फटका टीम मालक शाहरुख खानला बसलाय.

जाहिरात
Read Time: 3 mins
IPL 2025 KKR : कोलकाता नाईट रायडर्सच्या मॅनेजमेंटनं केलेल्या चुकीचा मोठा फटका शाहरुख खानला बसला आहे.
मुंबई:

आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी सर्व 10 टीमनं रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक टीमला जास्तीत जास्त 6 खेळाडू रिटेन किंवा RTM (राईट टू मॅच) करता येणार होते. कोलकाता नाईट रायडर्सनं 6 खेळाडू रिटेन केले आहेत. त्यामुळे त्यांना आता मेगा ऑक्शनमध्ये एकही खेळाडू RTM करता येणार नाही. केकेआरनं खेळाडूंची  यादी जाहीर झाल्यानंतर एक मोठी चूक उघड झाली आहे. त्याचा थेट फटका टीम मालक शाहरुख खानला बसलाय.

कुणाला केलं रिटेन ?

आयपीएल 2024 मधील विजेत्या असलेल्या केकेआरनं यंदा सहा खेळाडूंना रिटेन केलं आहे. आंद्र रसेल, सुनील नरीन, रिंकू सिंह आणि वरुण चक्रवर्ती या चार आंतरराष्ट्रीय खेळाडूंना केकेआरनं रिटेन केलंय. या सर्वांनी गेल्या काही सिझनमध्ये केकेआरकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. रिंकू सिंहचा अपवाद वगळता अन्य तीन खेळाडूंना त्यांनी यापूर्वीच्या मेगा ऑक्शनमध्येही रिटेन केलं होतं. त्याचबरोबर हर्षित राणा आणि रमणदीप सिंह या नव्या दमाच्या खेळाडूंवरही (Uncapped Players) केकेआरन मॅनेजमेंटनं विश्वास दाखवला आहे.

( नक्की वाचा :  IPL 2025 RCB Retentions रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून धक्कादायक बातमी, विराटचा जवळचा मित्र बाहेर )

कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळाली?

  • रिंकू सिंह - 13 कोटी
  • सुनील नरीन - 12 कोटी
  • आंद्रे रसेल - 12 कोटी
  • वरुण चक्रवर्ती - 12 कोटी
  • हर्षित राणा - 4 कोटी
  • रमणदीप सिंह - 4 कोटी

कुठे चूक झाली?

कोलकाता नाईट रायडर्सनं घेतलेले सर्व खेळाडू हे मॅच विनर आहेत. त्यामुळे त्यांनी रिटेन करताना चांगले खेळाडू घेतले असं तुम्हाला वाटलं असेल तर ते बरोबरच आहे. केकेआर मॅनेजमेंटनं त्या आघाडीवर (खेळाडूंची निवड) चांगली कामगिरी केलीय. पण, एका चुकीमुळे शाहरुख खानला 12 कोटींचा फटका बसला आहे. हा फटका कसा बसला हे समजून घेऊया

केकेआरनं रिटेन केलेल्या खेळाडूंच्या एकूण रकमेची बेरीज केली तर (13+12+12+12+4+4) म्हणजेच 57 कोटी होते.  त्यामुळे आयपीएल मेगा ऑक्शनसाठी जाताना त्यांच्या खात्यामध्ये एकूण 120 कोटी बजेटमधील 57 कोटी वजा केले तर 63 कोटी शिल्लक हवेत. पण, त्यांना प्रत्यक्षात 51 कोटी रुपये खर्च करायला मिळणार आहेत.

नियम काय सांगतो?

बीसीसीआयनं यंदा खेळाडूंना रिटेन करण्यासाठी काही रक्कम जाहीर केली होती. ती काय होती ते पाहूया

रिटेन करण्यात येणारे खेळाडू आणि रक्कम

  • पहिला खेळाडू - 18 कोटी
  • दुसरा खेळाडू - 14 कोटी
  • तिसरा खेळाडू - 11 कोटी
  • चौथा खेळाडू - 18 कोटी
  • पाचवा खेळाडू - 14 कोटी
  • सहावा खेळाडू (uncapped players) - 4 कोटी

कोणत्याही फ्रँचायझीला ही निश्चित करण्यात आलेली रक्कम आणि प्रत्यक्ष खेळाडूंना देण्यात येणारी रक्कम यामध्ये बदल करण्याचा अधिकार होता. बहुतेक फ्रँचायझींनी तो केला देखील आहे. पण, हे करत असताना फ्रँचायझीनी खेळाडूंना दिलेली रक्कम आणि बीसीसीआयनं घालून दिलेली मर्यादा यामध्ये जी रक्कम जास्त असेल तितकी रक्कम फ्रँचायझीच्या खात्यातून कट होणार हे बीसीसीआयनं जाहीर केलं होतं.

केकेआरनं रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये चार आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळेले भारतीय खेळाडू आहेत. या सर्वांना रिटेन केलं तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी (18+14+11+18) = 61 कोटी आणि दोन अनकॅप खेळाडूंसाठी (4+4) म्हणजेच 8 कोटी रुपये खर्च होतील. ही सर्व बेरीज 69 कोटी होते.

( नक्की वाचा : IPL 2025 DC Retentions List : दिल्लीचा राजा बदलणार! ऋषभ पंतची ऑक्शनमध्ये एन्ट्री )

केकेआरनं प्रत्यक्ष खेळाडूंना दिलेली रक्कम ही 57 कोटी आहे. पण त्यांच्या खात्यातून जास्तीचे 12 कोटी रुपये मॅनेजमेंटच्या या अजब कारभारामुळे गेले आहेत. त्यामुळे शाहरुख खानच्या खिशाला 12 कोटींचा फटका बसलाय. त्याचबरोबर आगामी आयपीएल ऑक्शनमध्येही टीमला हात आखडता घ्यावा लागणार आहे.

Topics mentioned in this article