IPL 2025 Delhi Capitals Retentions : आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात ऋषभ पंत पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार नाही. पंतनं अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर 2016 साली दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून तो या टीमचा सदस्य आहे. तो मागील सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टनही होता. पण, ऋषभ पंतनं आगामी आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दिल्लीला नवा कॅप्टन मिळणार हे स्पष्ट झालंय.
दिल्ली कॅपिटल्सनं आगामी मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी सादर केली आहे. त्यानुसार अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या टीम इंडियाच्या खेळाडूंना दिल्लीनं रिटेन केलं आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा उगवता सुपरस्टार ट्रिस्टन स्टब्स, आणि अनकॅप विकेट भारतीय किपर अभिषेक परोललाही दिल्ली कॅपिटल्सनं रिटेन केलं आहे. या चार खेळाडूंना मिळून दिल्ली कॅपिटल्सनं 43 कोटी 75 लाख रुपये खर्च केले आहेत.
( नक्की वाचा : IPL 2025 Retentions : धोनी आयपीएल खेळणार, 5 दिग्गजांवर CSK चा विश्वास )
दिल्ली कॅपिटल्सनं रिटेन केलेले खेळाडू आणि त्यांना मिळालेली रक्कम
- अक्षर पटेल - 16.50 कोटी
- कुलदीप यादव - 13.25 कोटी
- ट्रिस्टन स्टब्स - 10 कोटी
- अभिषेक परोल - 4 कोटी
नवा कोच नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन रिकी पॉन्टिंग यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच होता. या सिझनपूर्वी पॉन्टिंगचा करार समाप्त झालाय. पॉन्टिंगच्या जागी दिल्ली कॅपिटल्सनं हेमांग बदानीची दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
( नक्की वाचा : IPL 2025 Retentions : रोहित शर्माचं ठरलं ! मुंबई इंडियन्सं 5 खेळाडूंना केलं रिटेन, वाचा संपूर्ण यादी )
आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला आजवर कधीही या स्पर्धेचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. आजपर्यंत त्यांना फक्त एकदाच स्पर्धेची फायनल गाठता आली आहे. आता नवा कोच आणि नव्या कॅप्टनसह हा इतिहास बदलण्याचं आव्हान दिल्ली कॅपिटल्ससमोर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world