IPL 2025 : ठाकूर तुला मानलं रे... 5 वाईड बॉल ठरले मॅचचा टर्निंग पॉईंट, 'लॉर्ड'चं भन्नाट डोकं समजलं का?

IPL 2025, KKR vs LSG : खनौ सुपर जायंट्सचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरनं टाकलेले सलग 5 वाईड बॉल लखनौच्या विजयात निर्णायक ठरले. ते कसं? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

वाईड बॉलमुळे दिला जाणारा अतिरिक्त रन हा बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी त्रासदायक असतो. अटीतटीटच्या सामन्यात हे अतिरिक्त रन्स मॅचच्या निकालामध्ये निर्णायक ठरु शकतात. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (KKR vs LSG) ही आयपीएलमध्ये मंगळवारी (8 एप्रिल) रोजी झालेली मॅच चांगलीच अटीतटीची ठरली. या मॅचमध्ये लखनौनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 आऊट 238 रन्स केले. केकेआरनं निर्धारानं या मोठ्या स्कोअरचा पाठलाग केला. पण, त्यांना फक्त 4 रननं अपुरे ठरले. विशेष म्हणजे लखनौ सुपर जायंट्सचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरनं टाकलेले सलग 5 वाईड बॉल लखनौच्या विजयात निर्णायक ठरले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अटीतटीच्या सामन्यात प्रत्येक बॉल आणि रन हा महत्त्वाचा असतो. केकेआरनं हा सामना फक्त 4 रननं गमावला. त्यावेळी शार्दुलनं सलग पाच वाईड बॉल टाकत केकेकेआरला पाच अतिरिक्त रनची मदत केली तसंच त्यांना पाच जास्त बॉल खेळण्याची संधी देखील दिली. त्यानंतरही शार्दुलची ही ओव्हर मॅचचा टर्निंग पॉईंट ठरली हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Advertisement

KKR होतं वरचढ

शार्दूल ठाकूर केकेआरच्या इनिंगमधील 13 वी ओव्हर टाकायला आला त्यावेळी कोलकाताचे 12 ओव्हरमध्ये 2 आऊट 149 रन झाले होते. केकेआरला सामना जिंकण्यासाठी 48 बॉलमध्ये 90 रन्सची गरज होती. अजिंक्य रहाणे (30 बॉल 54) आणि व्यंकटेश अय्यर (20 बॉल 36) खेळत होते. अजिंक्य आणि व्यंकटेशची जोडी मैदानात अक्षरश: धुमाकूळ घालत होते. केकेआरच्या आणखी 8 विकेट्स शिल्लक होत्या. त्यांना सामना जिंकण्यासाठी 48 बॉलमध्ये 90 रन्सची गरज होती. थोडक्यात हा सामना केकेआरकडं झुकला होता.

Advertisement

( नक्की वाचा : Priyansh Arya : फक्त 39 बॉलमध्ये CSK विरुद्ध सेंच्युरी, एका ओव्हरमध्ये मारले आहेत 6 सिक्स ! )

क्रिकेट मॅचमध्ये सेट झालेल्या बॅटरनं मॅचची गती कायम राहणं आवश्यक असतं. ती गती कमी झाली, सामना काही कारणामुळे लांबला तर त्याची एकाग्रता भंग होते. त्याचा फायदा समोरच्या टीमला विकेट मिळण्यात होतो.

Advertisement

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये सामना काही काळ दक्षिण आफ्रिकेकडं झुकला होता. त्यावेळी विकेट किपर ऋषभ पंतनं डोकं लावून सामना संथ केला. त्याचा फायदा आम्हाला झाला, हा किस्सा कॅप्टन रोहित शर्मानं फायनलनंतर काही दिवसांनी सांगितला होता. 

टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये हे डोकं लावणारा ऋषभ पंत लखनौचा कॅप्टन आहे. पंतनं त्याचा सर्वात प्रमुख बॉलर असलेल्या शार्दूलच्या मदतीनं जो प्लॅन आखला त्यामुळे मॅचचं चित्र बदललं.

शार्दूलनं बदललं चित्र

कोलकाताच्या इडन गार्डन्सवर हा सामना सुरु होता. या पिचवर बॉल आरामात बॅटवर येत होता. बॉल बॅटवर आला की सहज रन होत होते. दोन्ही इनिंगमध्ये ही परिस्थिती कायम होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी बॉल बॅटवर सहज येऊ न देणं हा पर्याय होता. शार्दूलनं 13 ओव्हरमध्ये तेच केलं.

बॉल बॅटवर येऊ नये यासाठी त्यानं तो बॅटपासून दूर टाकण्यास सुरुवात केली. या प्रयत्नात त्यानं सलग 5 बॉल वाईड टाकले. त्यामुळे केकेआरला अतिरिक्त रन्स मिळाले. पण, मॅचची गती कमी झाली.  लखनौला त्याचा फायदा लगेच झाला. त्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर शार्दूलनं अजिंक्यला आऊट केलं.

.... आणि सामना फिरला

लखनौला मॅचमध्ये परत येण्यासाठी अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर ही जमलेली जोडी फुटणं आवश्यक होतं. शार्दूलनं सलग पाच वाईड टाकले. पण, त्यानं अजिंक्यला आऊट करुन त्याचं काम केलं. त्यानंतर केकेआरच्या विकेट कोसळण्यास सुरुवात झाली. 

रमणदीप सिंह, अंगीकृश रघुवंशी झटपट आऊट झाले. त्यानंतर व्यंकटेश अय्यर देखील रनरेट वाढवण्याच्या नादात आऊट झाला. स्वत: शार्दूल ठाकूरनं धोकादायक आंद्रे रसेलचा अडथळा दूर केला. त्यानंतर सामना पूर्णपणे लखनौच्या बाजूनं झुकला. रिंकू सिंहनं निकाराची फटकेबाजी करत केकेआरला टार्गेटच्या जवळ नेलं, पण त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. लखनौच्या विजयात शार्दुल ठाकूरचं हे भन्नाट डोकं महत्त्वाचं ठरलं. 
 

Topics mentioned in this article