जाहिरात

Priyansh Arya : फक्त 39 बॉलमध्ये CSK विरुद्ध सेंच्युरी, एका ओव्हरमध्ये मारले आहेत 6 सिक्स !

Who is Priyansh Arya? : मुळचा दिल्लीकर असलेल्या प्रियांशनं चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) फक्त 39 बॉलमध्येच सेंच्युरी झळकावत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

Priyansh Arya : फक्त 39 बॉलमध्ये CSK विरुद्ध सेंच्युरी, एका ओव्हरमध्ये मारले आहेत 6 सिक्स !
मुंबई:

Who is Priyansh Arya? आयपीएल स्पर्धेनं नेहमीच अनोळखी खेळाडूंना मोठं केलं आहे. या स्पर्धेनं फक्त त्या खेळाडूला ग्लॅमर दिलं नाही तर त्यांना थेट निवड समिचतीच्या नजरेसमोर आणून ठेवलं. आर. अश्विन ते रिंकू सिंह, हार्दिक पांड्या ते हर्षित राणा अशी ही भली मोठी यादी आहे. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडलीय. ते नाव आहे, प्रियांश आर्य! मुळचा दिल्लीकर असलेल्या प्रियांशनं चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) फक्त 39 बॉलमध्येच सेंच्युरी झळकावत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगला उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉईनिस, नेहाल वढेरा आणि ग्लेन मॅक्सवेल हे सर्व रथी-महारथी स्वस्तामध्ये आऊट झाले. पण, ओपनिंगला बॅटिंगला उतरलेल्या प्रियांशवर त्याचा परिणाम झाला नाही.

प्रियांशनं एका बाजूनं आक्रमक बॅटिंग करत फक्क 39 बॉलमध्येच सेंच्युरी झळकावली. त्यानं या खेळीत 7 फोर आणि 9 सिक्स लगावले. आर. अश्विन, रविंद्र जडेजा आणि नूर अहमद या सीएसकेच्या स्पिन बॉलिंगचा त्यानं सहजपणे सामना केला. नूरनं त्याला अखेर आऊट केलं. पण, त्यापूर्वी त्यानं 42 बॉलमध्ये 103 रन काढले होते. या खेळीत 7 फोर आणि 9 सिक्स मारले. त्याचा स्ट्राईक रेट होता तब्बल 245.23

( नक्की वाचा : IPL 2025 : भन्नाट कॅच, पहिल्याच बॉलवर विकेट! कोण आहे मुंबईचा नवा स्टार Ashwani Kumar? )
 

3 टीममध्ये होती चुरस

प्रियांश आर्य हा पहिलाच आयपीएल सिझन (IPL 2025) आहे. या सिझनपूर्वी त्याचं नाव देशातील सर्व क्रिकेट फॅन्सना माहिती नव्हतं. पण, आयपीएल फ्रँचायझींसाठी हे नाव नवीन नव्हतं. त्याला ऑक्शनमध्ये खरेदी करण्यासाठी पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुमध्ये चांगलीच चुरस रंगली होती.अखेर पंजाब किंग्जनं (Punjab Kings) त्याला 3.8 कोटींना खरेदी केले. पंजाबच्या मॅनेजमेंटनं दाखवलेला विश्वास  प्रियांशनं सार्थ ठरवला. पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या सीएसके विरुद्ध त्यानं दमदार सेंच्युरी झळकावली.

6 बॉलमध्ये 6 सिक्स

24 वर्षांचा प्रियांश हा डाव्या हातानं बॅटिंग करणारा आक्रमक खेळाडू आहे. तो दिल्ली प्रीमियर लीगमुळे सर्वात प्रथम चर्चेत आला होता. या स्पर्धेत दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळताना त्यानं एकाच ओव्हरमध्ये सलग सहा सिक्स लगावले होते. त्यानं डीपीएलमध्ये 600 पेक्षा जास्त रन केले होते.

आयपीएलपूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही प्रियांश चमकला होता. या स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना त्यानं उत्तर प्रदेशमध्ये 43 बॉलमध्ये 102 रनची खेळी केली होती. त्याच्या या आक्रमक बॅटिंगमुळे त्याला खरेदी करण्यासाठी आयपीएल फ्रँचायझींमध्ये चुरस रंगली होती.

या सिझनमध्ये पंजाब किंग्जची टीम नव्या पद्धतीनं उतरलीय. श्रेयस अय्यरच्या या टीमचा आक्रमकता हा मंत्र आहे. याच बेडर वृत्तीला साजेशी प्रियांशची बॅटिंग आहे. त्याची नेटमधील बॅटिंग पाहून त्याला थेट ओपनिंगला उतरवण्याचा निर्णय पंजाबच्या मॅनेजमेंटनं घेतला. तो निर्णय अगदी अचूक असल्याचं आता सिद्ध झालं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: