IPL 2025 : पंजाबचा KKR ला दे धक्का, गतविजेत्यांवर मिळवला सनसनाटी विजय, नवा रेकॉर्डही केला

IPL 2025, PBKS vs KKR : आयपीएल 2024 मध्ये अजिंक्यपद पटकावणारी कोलकाता नाईट रायडर्सची टीम  (Kolkata Knight Riders) फॉर्मात आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

IPL 2025, PBKS vs KKR : आयपीएल 2025 मधील पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ही मॅच चांगलीच रंगतदार ठरली. पंजाबनं या मॅचमध्ये अवघ्या 111 रन्सचं यशस्वी संरक्षण केलं. 112 रन्सचं सोपं आव्हान केकेआरला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम फक्त 95 रन्सवर ऑल आऊट झाली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पंजाबचा फ्लॉप शो

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 245 असा दमदार स्कोअर पंजाबनं उभा केला होता. या मॅचमध्येेही याच पद्धतीनं मोठा स्कोअर करण्यासाठी श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता.

पंजाबच्या प्रियांश आर्या आणि प्रबसिमरन सिंग या ओपनिंग जोडीनं पहिल्या 3 ओव्हरमध्ये 39 रन काढत दमदार सुरुवात केली होती. पण, त्यानंतर पंजाबची घसरगुंडी उडाली. हर्षित राणानं (Harshit Rana) एकाच ओव्हरमध्ये प्रियांश आर्या आणि श्रेयस अय्यरला आऊट केलं. श्रेयसला भोपळा देखील फोडता आला नाही.

(IPL 2025 : वय वर्ष 17! एकाच मॅचमध्ये मारले होते 11 सिक्स! CSK चा नवा मुंबईकर उडवणार सर्वाची झोप )
 

हर्षितनं एकाच ओव्हरमध्ये दिलेल्या दोन धक्क्यानंतर पंजाबची टीम सावरलीच  नाही. त्यांची संपूर्ण टीम 15.3 ओव्हर्समध्ये 111 रनवर ऑल आऊट झाली. केकेआरकडून हर्षित राणा सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरीननं प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली. 

Advertisement

बॉलर्सचा जोरदार प्रतिकार

कोलकाता नाईट रायडर्स 112 रन्सचं आव्हान सहज पार करेल असं वाटत होतं. पण, पंजाब किंग्जनं तसं होऊ दिलं नाही. सुनील नरीन (5) आणि क्विंटन डी कॉक (2) झटपट आऊट झाले. कॅप्टन अजिंक्य रहाणेनं अंगीकृष रघुवंशीसोबत इनिंग सावरली.

युजवेंद्र चहललनं अजिंक्य रहाणेला (17) आऊट करत ही जोडी फोडली. कॅप्टन आऊट झाल्यानंतर केकेआरची घसरगुंडी उडाली. त्यांनी चार रनमध्ये चार विकेट्स गमावल्या. त्यामुळे 3 आऊट 72 वरुन केकेआरची अवस्था 7 आऊट 76 झाली होती. 

Advertisement

रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह आणि रमणदीप सिंह झटपट आऊट झाले. युजवेंद्र चहलनं झटपट 4 विकेट्स घेत पंजाबला विजयाची आशा दाखवली. मार्को यान्सननं हर्षित राणाला देखील झटपट आऊट केलं. 

रसेलची फटकेबाजी

केकेआरची अवस्था 8 आऊट 79 झाली होती त्यावेळी आंद्रे रसेलनं मॅचची सूत्रं हाती घेतली. त्यानं मॅचमधील सर्वात यशस्वी बॉलर यजुवेंद्र चहलच्या ओव्हरमध्येच हल्ला केला. रसेलनं चहलच्या एका ओव्हरमध्ये 2 सिक्स आणि 1 फोर लगावला. 

Advertisement

अर्शदीप सिंगनं 15 वी ओव्हर चांगलीच नाट्यमय ठरली. वैभव अरोरानं अर्शदीपच्या तिखट माऱ्याचा चांगला प्रतिकार केला. त्यानं त्या ओव्हरमधील पाच बॉल धैर्यानं खेळून काढले. वैभव पूर्ण ओव्हर खेळणार असं वाटत असतानाच त्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अर्शदीपला विकेट मिळाली. त्यानं वैभवला आऊट केलं.

पंजाबचा रेकॉर्ड

मार्को यान्सननं त्यानंतर आंद्रे रसेलला आऊट करत पंजाबच्या सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केलं. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी स्कोअरचं यशस्वी संरक्षण पंजाबनं केलं आहे. 
 

Topics mentioned in this article