IPL 2025 Mega Auction KL Rahul : केएल राहुल झाला दिल्लीकर, शेवटच्या क्षणी केली CSK वर मात

IPL 2025 Mega Auction Live Update KL Rahul : टीम इंडियाचा विकेट किपर आणि बॅटर केएल राहुलची आयपीएल टीम ठरली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

IPL 2025 Mega Auction KL Rahul : टीम इंडियाचा विकेट किपर आणि बॅटर केएल राहुलची आयपीएल टीम ठरली आहे.  आयपीएल 2025 पूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये  दिल्ली कॅपिटल्सनं  14 कोटी रुपयांना खरेदी केलं.  राहुलच्या रुपानं दिल्ली कॅपिटल्सला विकेट किपर, ओपनर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅप्टन म्हणूनही भक्कम पर्याय मिळाला आहे. राहुलला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जनं बरेच प्रयत्न केले. पण, दिल्ली कॅपिटल्सनं त्यांच्यावर मात केली. 

राहुलची कारकिर्द

गेल्या काही महिन्यात दुखापत तसंच खराब फॉर्ममुळे राहुल चर्चेत आहे. पण, आजही या 32 वर्षांच्या भारतीय खेळाडूचं मुल्य मोठं आहे. राहुलनं कर्नाटककडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या राहुलनं 2010-11 मध्ये झालेला अंडर 19 वर्ल्ड कपही खेळला आहे.

राहुल यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB), पंजाब किंग्ज (PBKS) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) टीमचा सदस्य होता. आरसीबीला आयपीएल 2016 साली आयपीएल फायनल गाठून देण्यात राहुलचं योगदान मोलाचं होतं. त्यानं त्या सिझनमध्ये 146.79 च्या स्ट्राईक रेटनं 271 रन केले होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आरसीबीनंतर राहुल पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन टीमचा कॅप्टन होता. यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सनं त्याला 17 कोटी रुपयांमध्ये आयपीएल 2022 मधील मेगा ऑक्शनपूर्वी करारबद्ध केलं होतं. त्यावेळी नव्यानंच तयार झालेल्या लखनौ टीमनं त्यानं सलग तीन वर्ष कर्णधारपद भूषवलं. 

Advertisement

राहुलच्या कॅप्टनसीमध्ये लखनौनं आयपीएल 2022 आणि 2023 मधील 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला होता. पण, मागील सिझनमध्ये टीमची कामगिरी खालवाली आणि लखनौची टीम सातव्या क्रमांकावर फेकली गेली. 

( नक्की वाचा : 'तो कॅप्टन आहे, कुणी... KL राहुलच्या बचावासाठी पुढं आला शमी, लखनौच्या मालकांना सुनावलं )

या खराब कामगिरीबद्दल टीम मालक संजीव गोयंका यांनी भर मैदानात राहुलची कानउघाडणी करण्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतरच तो लखनौची टीम सोडणार हे स्पष्ट झालं होतं.

Advertisement

लखनौ सुपर जायंट्सनं रिटेन केलेल्या पाच खेळाडूंमध्ये राहुलचं नाव नव्हतं. त्यावेळी, 'आम्हाला जिंकण्याची मानसिकता असलेले खेळाडू हवे आहेत', असं गोयकांना नाव न घेता सांगितलं. त्यांचा हा टोला राहुलला उद्देशूनच असल्याचं मानलं जात होतं. लखनौच्या खराब कामगिरीचं विश्लेषण करण्यसाठी नेमलेल्या झहीर खान समितीनं देखील राहुलच्या संथ खेळावर ठपका ठेवल्याचा ठपका ठेवल्याचं वृत्त उघड झालं होतं.

लखनौ सोडल्यानंतर राहुलनं आता आपल्याला नव्यानं सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर कोणताही दबाव नसेल अशा ठिकाणी खेळण्याची इच्छा असल्याचं स्पष्ट केलं. 

Advertisement

( नक्की वाचा :  IPL 2025 Mega Auction Arshdeep Singh : अर्शदीप सिंगला लागली बडी बोली, वाचा कुणी केलं खरेदी? )

राहुलची उपयुक्तता

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव असलेल्या केएल राहुलला आयपीएलचाही तगडा अनुभव आहे. त्यानं आत्तापर्यंत 132 मॅचमध्ये 45.47 ची सरासरी आणि 134.61 च्या स्ट्राईक रेटनं 4683 रन केले आहेत. यामध्ये 4 सेंच्युरी आणि 37 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. आयपीएलमधील एका सिझनमध्ये सर्वाधिक रन्स करण्यासाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप त्यानं 2020 च्या सिझनमध्ये (IPL 2020) पटकावली आहे.

ओपनिंग आणि मिडल ऑर्डरमधील बॅटर तसंच विकेट किपर म्हणून राहुल उपयुक्त आहे. त्यानं आयपीएल स्पर्धेत 76 कॅच आणि 7 स्टम्प आऊट केले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेत कॅप्टन म्हणूनही राहुलला मोठा अनुभव आहे.   
 

Topics mentioned in this article