जाहिरात

IPL 2025 Mega Auction Arshdeep Singh : अर्शदीप सिंगला लागली बडी बोली, वाचा कुणी केलं खरेदी?

IPL 2025 Mega Auction Live Updates, Arshdeep Singh : अनेक आयपीएल टीमना अव्वल फास्ट बॉलरची गरज आहे. त्यामुळे अनुभवी अर्शदीपला चांगला भाव मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

IPL 2025 Mega Auction Arshdeep Singh : अर्शदीप सिंगला लागली बडी बोली, वाचा कुणी केलं खरेदी?
IPL 2025 Mega Auction Live, Arshdeep Singh
मुंबई:

IPL 2025 Mega Auction Live Updates : T20 क्रिकेटमधील टीम इंडियाचा प्रमुख फास्ट बॉलर अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) मोठी बोली लागली. अर्शदीपला 18 कोटी रुपयांमध्ये पंजाब किंग्जनं RTM च्या माध्यमातून रिटेन केलं आहे.  सौदी अरेबियात सुरु असलेल्या ऑक्शनमध्ये अर्शदीपला 18 कोटी रुपयांमध्ये पंजाब किंग्जनं रिटेन केलं.  अनेक आयपीएल टीमना अव्वल फास्ट बॉलरची गरज आहे. त्यामुळे अनुभवी अर्शदीपला चांगला भाव मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

वर्ल्ड कप विजयाचा शिल्पकार

टीम इंडियानं यावर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेला T20 वर्ल्ड कप जिंकला. तब्बल 17 वर्षांनी भारतीय क्रिकेट टीमनं वर्ल्ड कप विजेतेपदाची कामगिरी केली. भारतीय टीमच्या या विजेतेपदात अर्शदीपची कामगिरी महत्त्वाची होती. त्यानं या स्पर्धेतील 8 मॅचमध्ये 7.16 च्या इकोनॉमी रेटनं 17 विकेट्स घेतल्या होत्या. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीमध्ये अफगाणिस्तानच्या अर्शदीप फाजल फारुखीसह पहिल्या क्रमांकावर होता.

अर्शदीपची टीम इंडियाकडूनही T20 क्रिकेटमधील कामगिरी दमदार आहे. तो 2018 मधील अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य होता. त्यानं टीम इंडियाकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 60 मॅचमध्ये 95 विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून इंटरनॅशनल टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत अर्शदीप सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या युजवेंद्र चहलला मागं टाकण्यासाठी त्याला आणखी 2 विकेट्सची आवश्यकता आहे.

( नक्की वाचा : IND vs AUS : गंभीरच्या लाडक्या शिष्यानं केली 'डोकेदुखी' दूर, भन्नाट बॉलवर मिळाली मोठी विकेट, Video )
 

अर्शदीपचा आयपीएल रेकॉर्ड

अर्शदीपनं आयपीएल 2019 मध्ये पंजाब किंग्जकडून पदार्पण केलं. त्या सिझनमध्ये फक्त 3 मॅचचा अनुभव असूनही त्याला पंजाबनं आयपीएल 2020 मध्ये रिटेन केले होते. तो आत्तापर्यंत फक्त पंजाब किंग्जकडूनच आयपीएलमध्ये खेळला आहे. अर्शदीपनं आत्तापर्यंत 65 आयपीएल मॅचमध्ये 9.03 च्या इकोनॉमी रेटनं 76 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2024 मध्ये त्यानं 14 मॅचमध्ये 19 विकेट्स घेतल्या होत्या.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com